वाळू तस्करांनी पहाटे तलाठ्याला बदडले वाळू माफियांची दादागिरी

 0
वाळू तस्करांनी पहाटे तलाठ्याला बदडले वाळू माफियांची दादागिरी

वाळू तस्करांनी पहाटे तलाठ्याला बदडले

पैठण तालुक्यातील वाळू माफियांची दादागिरी 

पैठण, (प्रतिनिधी) : गोदावरीच्या पात्रात माल्या घालणाऱ्या वाळुतस्करांनी भल्या पहाटे एका तलाठ्याला बदडल्याची घटना घडली आहे. याबाबत तक्रारीची नोंद झालेली नसली तरी मध्यरात्री विना संरक्षण तसेच पथकातील सहकार्यांना सोबत न घेता हा तलाठी एकटा वाळुपट्ट्यात कोणत्या कारवाईसाठी गेला होता ? असा प्रश्न उपस्थित केला जात असून मुजोर वाळूमाफियांचा दरारा र मात्र वाढत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

व प्रशासनाचे खच्चीकरण करणारी घटना

■, ग ती ग नी र न डे त

 नेच शुक्रवारी पहाटे गोदापात्रात अवैध वाळूउपसा व वाहतूक सुरू नी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सदर तलाठी कारवाई साठी गेले असता वाळू तस्करांनी थेट शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच मारहाण केली. पैठण तहसील कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांचे मनोबल न. खच्चीकरण करणाऱ्या या घटनेची चे वाच्यता झाली. मात्र याबाबत उप रे विभागीय अधिकारी नीलम बाफना तसेच तहशीलदार झंपले यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

३० ते ३५ लाख रुपयांची वाळुचोरी

तालुक्यात जवळपास ४० यारी मशीनच्या द्वारे अवैध वाळुचे उत्खनन करून तेथेच वाळुसाठा केला जातो. नंतर हायवा, ट्रक व ट्रॅक्टर अशा वाहनांतून छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना व अहिल्यानगर आदी ठिकाणच्या बांधकाम साइटवर ही वाळू अवैध वाहतूकीद्वारे पोहोचवली जाते. पैठणची वाळू ही बांधकाम क्षेत्रात अत्यंत दर्जेदार मानली जात आहे. त्यामुळे दररोजची ३० ते ३५ लाख रुपयांची वाळुचोरी, वाहतूक व विक्री केली जात आहे.

वाळुपट्ट्यात सशस्त्र गुंडांसह यंत्रसामग्री

पैठण शहरातील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या कावसान (जुने) येथील गजगड बाबा मंदिर परिसरात यंत्रसामग्री लाऊन खुलेआम वाळूउपसा चालू आहे. दादेगाव (जहाँगीर) हे वाळुचोरीचे मुख्य केंद्र आहे. दोन्ही काठांवर तब्बल १३ यऱ्या, ट्रॅक्टर व अन्य यंत्रांसह सशस्त्र गुंडही तैनात करण्यात आले आहेत. आवडे ऊंचेगाव, टाकळी अंबड, तुळजापूर व नवगाव येथेही वाळुचोर सक्रिय आहेत. महसूल व पोलीस प्रशासनही तेथे जात नसल्याने वाळूमाफियांची हिंमत वाढत चालली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow