पोलीस ठाणे चिकलठाणा हद्दीतील आदीत्य इंडस्ट्रीज कंपनीतील साहित्य चोरी करणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

पोलीस ठाणे चिकलठाणा हद्दीतील आदीत्य इंडस्ट्रीज कंपनीतील साहित्य चोरी करणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद
पोलीस स्टेशन चिकलठाणा येथे दिनांक 29/01/2025 रोजी फिर्यादी नामे युवराज वियद्यानंद मोकळे वय 38 वर्षे धंदा व्यापार रा प्लॉट नं 59-5 (पी) प्रकाशनगर ता.जी. छत्रपती संभाजीनगर
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
यांनी तक्रार दिली कि, दि. 25/01/2025 रोजीचे 18.30 ते दि. 27/01/2025 चे 10.30 वाजेच्या दरम्यान एम.आय.डी.सी. मधील आदीत्य इंडस्ट्री मध्ये फरशी सकियो से 100 करणारे दोन स्टेनलेस स्टिलचे मिक्सर, 2 टेबल फैन, बजन काटा व पिटर मशीन असा एकूण 321,000/- रु. मुद्देमाल हा कोणीतरी अज्ञात चोरट्याने कंपनीचे पालो मिटर सम्मान आणला आहे रे मजकुराचे तक्रारी वरुन पोलीस स्टेशन चिकलठाणा गु.र.प्रमाणे 37/2025 मनमाड 334(1),305 बी.एन.एस प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे.
सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करित असतांना पोलीस निरीक्षक सतीष वाघ यांना गोपनीय बातमीदाराकडून व तांत्रिक विश्लेषण आधारे खात्रीलायक माहिती मिळाली कि, सदर गुन्हा हा शेंद्रा एमआयडीसी येथील आरोपी नामे विशा आधारे शिदे याने त्याचे साथीदार यांनी मिळून केला असल्याची खात्रीलायक माहिती एका युवकाने सदर आरोपीचा त्याचे राहते घरी जावून शोध घेतला असता तो मिळून माहिती मिळाल्याने स्था. गु.शा. पथकाने याचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली देवून सदर गुन्हा करतांनी त्याचे सोबत असलेले साथीदार नामे 2) गणेश नारायण बन वय 23 वर्ष रा. गंगापुर जहांगीर ता.जि. छत्रपती संभाजीनगर 3) विजय बलभीम हजारे वय 24 वर्ष रा. सुंदरवाडी ता.जि. छत्रपती संभाजीनगर (4) रामेश्वर अशोक पांचाळ वय 20 वर्षे रा कॅम्ब्रोज चौक ता.जि. छत्रपती संभाजीनगर यांनी मिळून केला असल्याचे कळविल्याने आरोपीतांचा शोध घेतला असता वरील आरोपी मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून सदर आरोपीतांकडून गुन्हयातील चोरी गेलेला संपुर्ण माल व गुन्हा करतांनी वापरलेले अशोक लेलण्ड कंपनीचे पिकअप. व दोन मो. सा. असा एकूण 9,69,000/- रु किमतीचा मुद्देमाल आरोपीतांकडून हस्तगत करून नमूद आरोपीतांना सदर गुन्हयाचे पुढील तपास कामी पोलीस ठाणे चिकलठाणा यांचे ताब्यात देण्यांत आले, असुन पुढील तपास पोलीस ठाणे चिकलठाणा हे करित आहे..
सदरची कामगिरी श्री. विनयकुमार राठोड, पोलीस अधीक्षक, श्री. सुनिल लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ, सपोनि सुधीर मोटे, पोह संतोष पाटील, सुनिल खरात, विठ्ठल डोके, गोपाल पाटील, प्रशांत नांदवे, पोना दिपक सुरोशे, पोअं योगेश तरमळे, जिवन घोलप राहुल गायकवाड, संतोष डमाळे यांनी केली आहे.
What's Your Reaction?






