इम्तियाज जलील विरोधात गारखेडा पोलीस स्टेशन मध्ये ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल
इम्तियाज जलील विरोधात गारखेडा पोलीस स्टेशनमध्ये ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल
औरंगाबाद,(प्रतिनिधी दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क : : पूर्व मतदार संघातील शिवाजीनगर येथील पंडित जवाहर नेहरू महाविद्यालयातील बुथवर मतदारांना दमदाटी करत गोंधळ घातल्याप्रकरणी पूर्व मतदारसंघ एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्यासह इतर १० ते १२ जणांवर पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आनंद बनसोडे यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास फिर्यादी पोलीस स्टाफसह पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालय येथील सेक्टर नंबर ३ येथे मतदान बंदोबस्तावर होते.
[ बुथ क्र. ९७ च्या खोली क्रमांक २ समोर इम्तियाज जलील हे त्यांच्यासोबत दहा ते बारा जणांना घेऊन आले. बोगस मतदान होत आहे असा आरोप करीत मतदानासाठी तेथे उपस्थित असलेल्या सहा-सात लोकांना मारहाण केली. याप्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
What's Your Reaction?






