फायनान्सच्या वसुलीवाल्यांनी आता सुरू केली लूटमार!; २२ वर्षीय तरुणाला सिडकोत चाकूचा धाक दाखवून लुटले...

 0
फायनान्सच्या वसुलीवाल्यांनी आता सुरू केली लूटमार!; २२ वर्षीय तरुणाला सिडकोत चाकूचा धाक दाखवून लुटले...

: धक्कादायक... फायनान्सच्या वसुलीवाल्यांनी आता सुरू केली लूटमार !; २२ वर्षीय तरुणाला सिडकोत चाकूचा धाक दाखवून लुटले...

छत्रपती संभाजीनगर

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क 

फायनान्स कंपन्यांच्या वसुलीवाल्यांनी आता लूटमार सुरू केली आहे. एका तरुणाचे गाडीचे ३ हप्ते थकले म्हणून त्याला सिडको एन १ मधील लोकसेवा हॉटेलसमोर अडवून दोघांनी चाकूचा धाक दाखवला आणि मोटारसायकल व खिशातील १० हजार हिसकावून पळून गेले. सिडको एमआयडीसी पोलिसांनी दोघा लुटारूंविरुद्ध आज, १९ जूनला गुन्हा दाखल केला आहे.

सुरज सुनिल बेद्रे (वय २२, रा. दैवत खानावळीसमोर कामगार चौक एन २, सिडको) याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो उच्च न्यायालयातील सरकारी वकिलांच्या कार्यालयात कंत्राटी पध्दतीने शिपाई म्हणून काम करतो. त्याने त्याचे मामा रामेश्वर अशोक उदावंत (रा. बीड) यांच्या नावावर होंडा शाईन मोटारसायकल (MH 23 BF 7678) इंड्यूस्लैंड फायनान्स कंपनी शाखा बीड यांच्याकडून फायनान्सवर बीड येथील होन्डा शोरूम येथून खरेदी केली आहे. फायनान्सचे तीन हप्ते (९ हजार रुपये) देणे बाकी आहे. तो नेहमी हप्ते भरत असल्याने थकीत राहिलेल्या हप्त्यांबाबत फायनान्सकडून कोणीही त्याला संपर्क केलेला नाही.

 १२ जूनला सुरज हा आई भाग्यश्री सुनिल बेद्रे यांच्यासह घरून कामगार चौक सिडको येथून API कॉर्नरमार्गे प्रोझोन मॉलसमोरून एन १ पोलीस चौकीमार्गे चिश्तिया कॉलनीकडे जाण्यास निघाला. मोटारसायकल लोकसेवा हॉटेलसमोर येताच दुपारी सव्वा चारला मागून पांढरी स्विफ्ट कार आली. तिच्या चालकाने हॉर्न वाजविले. त्यामुळे सुरजने मागे वळून बघितले असता कारचालकाने जवळ येण्याचा इशारा केला. त्यामुळे सुरजने मोटारसायकल लोकसेवा हॉटेलसमोर रोडच्या कडेला घेतली. मोटारसायकल उभी करून तो व त्याची कारमधील व्यक्तीकडे गेले असता कारमधून दोघे उतरले.

 प्रोझोन मॉलसमोरून एन १ पोलीस चौकीमार्गे चिश्तिया कॉलनीकडे जाण्यास निघाला. मोटारसायकल लोकसेवा हॉटेलसमोर येताच दुपारी सव्वा चारला मागून पांढरी स्विफ्ट कार आली. तिच्या चालकाने हॉर्न वाजविले. त्यामुळे सुरजने मागे वळून बघितले असता कारचालकाने जवळ येण्याचा इशारा केला. त्यामुळे सुरजने मोटारसायकल लोकसेवा हॉटेलसमोर रोडच्या कडेला घेतली. मोटारसायकल उभी करून तो व त्याची कारमधील व्यक्तीकडे गेले असता कारमधून दोघे उतरले.

त्यांनी गाडीचे हप्ते थकलेले आहेत गाडी द्या किंवा तत्काळ हप्ते भरा, असे सांगितले. त्यावर त्यांना तुम्ही कोण आहात, तुमची ओळखपत्रे दाखवा, असे सुरजने सांगितले. त्यावर दोन्ही व्यक्तींनी ओळखपत्रे नाहीत, असे सांगितले. त्यांनी चाकूचा धाक दाखवून बळजबरीने मोटारसायकल हिसकावून घेतली व दुसऱ्याने सुरजच्या पँटच्या खिशातील १० हजार रुपये असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतले. मोटारसायकल व पैसे घेऊन ते पसार झाले.

आहात, तुमची ओळखपत्रे दाखवा, असे सुरजने सांगितले. त्यावर दोन्ही व्यक्तींनी ओळखपत्रे नाहीत, असे सांगितले. त्यांनी चाकूचा धाक दाखवून बळजबरीने मोटारसायकल हिसकावून घेतली व दुसऱ्याने सुरजच्या पँटच्या खिशातील १० हजार रुपये असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतले. मोटारसायकल व पैसे घेऊन ते पसार झाले.

असे आहे वर्णन...

एक अनोळखी व्यक्ती काळसर रंगाचा उंची अंदाजे वय ३० ते ३२ फुटांचा अंगाने जाड, डोक्याचे केस काळसर मागे वळलेले मध्यम स्वरुपाचे व अंगात निळसर शर्ट व निळी जिन्स पॅट घातलेला मराठी भाषा बोलणारा. दुसरा व्यक्ती गोऱ्या रंगाचा उंची अंदाजे पाच फूट, अंदाजे वय ३० ते ३५ वर्षे अंगाने सडपातळ डोक्याचे केस भुरके मध्यम अंगात पांढऱ्या रंगाचे शर्ट व क्रिम रंगाची सुती पँट घातलेला मराठी भाषा बोलणारा. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow