महा विकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांनी वकील संघाशी साधला संवाद वकील संघाचा राजू शिंदे यांना पाठिंबा
महा विकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांनी
वकील संघाशी साधला संवाद
• वकील संघाचा राजू शिंदे यांना पाठिंबा
छत्रपती संभाजी नगर: महा विकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांनी बुधवारी दि. 13 नोव्हेंबर दुपारी 1 वाजेच्या सुमारास जिल्हा व सत्र न्यायालय येथील
जिल्हा वकील संघाची भेट घेऊन मशाल या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी
वकील संघाने राजू शिंदे यांना जाहीर पाठिंबा दर्शवला. तत्पूर्वी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष: ऍड . मिलिंद पाटील व सचिव ऍड. तीर्थराज चावरे यांच्या वतीने राजू शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ऍड. मिलिंद पाटील यांनी जिल्हा वकील संघ आपल्या पाठीशी उभा राहील, अशी ग्वाही दिली. जिल्हा वकील संघाचे सचिव ऍड. चावरे यांनी जिल्हा वकील संघाचे सुमारे 7 हजार मेंबर आहेत. वकील संघ, पक्षकार, नातेवाईक यांच्या मदतीने आम्ही आपल्या विजयात खारीचा वाटा उचलू, असा विश्र्वास दिला.
सत्काराला उत्तर देताना महा विकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे म्हणाले, माझ्यावर विश्र्वास दाखवल्या बद्दल आपले आभार मानतो. जिथे माझी आवशकता आहे तिथे मी नक्कीच उभा राहीन, अशी ग्वाही दिली.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख त्रिंबक तुपे यांनी राजू भाऊ शिंदे हा सर्व सामान्य कार्यकर्ता आहे. तो आपल्यातला माणूस आहे. ही लढाई धनशक्ती विरोधात जनशक्तीची आहे. या लढाईत आपण आम्हाला मतदानरूपी मदत करून येत्या 20 तारखेला मशाल चिन्हावर मतदान करा. आणि राजू शिंदे यांना मताधिक्याने निवडून द्या. असे आवाहन करण्यात आले. यावेळी जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष ऍड. सुवर्णा डोनगावकर, ऍड. सुनील पडूळ, ऍड. करण गायकवाड, ऍड. राहुल भगत, ऍड. धनेश गवळी, ऍड. कैलास जाधव, ऍड. राहुल जमदाडे, ऍड. सुप्रिया कनगरे, ऍड. संदीप कोल्हे, ऍड. आशिष कोलते, ऍड. शाहरुख खान, ऍड. योगेश सुरडकर, ऍड. सुधीर तेलगोटे, ऍड. ममता झालटे आदींसह विधी तज्ञाची उपस्थिती होती.
-्
महा विकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांच्या प्रचारार्थ
राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चा पदाधिकारी, कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादीचे नेते खाजा भाई, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख त्रिंबक तुपे, आदींची व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख त्र्यंबक तुपे यांनी
आपली चांगली परिस्तिथी आहे. आपल्याला तनमनधनाने काम करावे लागेल. आपले कार्यकर्ते कामाला लागले आहे. येणाऱ्या 23 तारखेला राजू भाऊ यांना विधान सभेवर पाठवायचे आहे. आता 6 ते 7 दिवस आपल्याला सांभाळायचे आहे. नंतर विजय आपलाच आहे. उमेदवार प्रत्येक ठिकाणी जाऊ शकणार नाही. त्यामुळे आपणच उमेदवार समजून प्रत्येकांच्या घरापर्यंत जावं. आपल्याला एक एक मत बहुमूल्य असून एक सामान्य कार्यकर्ता राजू शिंदे यांना विधान सभेवर पाठवायचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा, शहर, तालुका आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?






