चिकलठाण्यातील बंद पडलेल्या कंपनीत तरुणाचा खून?, चौघांचा दावा अपघाताचा; आई म्हणते ढकलून दिले !

 0
चिकलठाण्यातील बंद पडलेल्या कंपनीत तरुणाचा खून?, चौघांचा दावा अपघाताचा; आई म्हणते ढकलून दिले !
चिकलठाण्यातील बंद पडलेल्या कंपनीत तरुणाचा खून?, चौघांचा दावा अपघाताचा; आई म्हणते ढकलून दिले !

चिकलठाण्यातील बंद पडलेल्या कंपनीत तरुणाचा खून?, चौघांचा दावा अपघाताचा; आई म्हणते ढकलून दिले !

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिकलठाणा परिसरातील सिंदीबन येथील आस्मानतारा कंपनीच्या पत्र्याच्या शेडवर चढलेला ३१ वर्षीय तरुण पडल्याने त्याचा मृत्यू झाला. तो पडला की त्याला ढकलले, याबद्दल संशय असून, सिडको एमआयडीसी पोलिसांनी त्याच्या ४ मित्रांविरुद्ध आज, ७ मार्चला दुपारी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तरुणाच्या आईने या प्रकरणात हत्येचा संशय व्यक्त केला आहे.

श्यामकोरबाई अण्णा ढगे (वय ५०, रा. सिंदीबन अशोकनगर चिकलठाणा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्या कुटुंबासह राहतात. भाजीपाला विकून उदरनिर्वाह करतात. ३ मार्चला रात्री ९ च्या सुमारास त्या, त्यांचे पती व लहान मुलगा आनंद (वय ३१) घरी होते. त्यावेळी योगेश दशरत लहाने (वय २३, रा. शहानगर अशोकनगर चिकलठाणा), सोनू उर्फ प्रविण शिंदे (वय अंदाजे ३३, रा. शहानगर अशोकनगर चिकलठाणा), सचिन संजय ढगे (वय अंदाजे ३५, रा. मिसारवाडी) हे तिघे घरासमोर आले. त्यांनी आनंदला आवाज दिला. आनंद दरवाजा उघडून बाहेर जायला लागला तेव्हा श्यामकोरबाईंनी त्याला कुठे जात आहेस, असे विचारले

 दोघांनी वेगवेगळी उत्तर दिल्याने श्यामकोरबाईंना संशय आला. त्यांनी मुलगी कविता यांना सांगितले, की आस्मानतारा कंपनी सिंदीबन चिकलठाणा येथे काय झाले तू बघून ये. तेव्हा कविता या कंपनीत गेल्या. तिथे कविताने कंपनीत वॉचमन म्हणून काम करत असलेल्या संजय बालाजी ढगे व त्यांची पत्नी शोभा संजय ढगे यांना विचारले. त्यांना त्याबद्दल काही माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. कंपनीत जाऊन पाहिले असता कंपनीमध्ये रक्त पडलेले दिसले. वॉचमन संजय ढगे याने आनंद आणि त्याच्या मित्रांना कंपनीत बोलावून आनंदला बंद पडलेल्या कंपनीच्या पत्र्याच्या शेडवर चढण्यास सांगितले. कंपनी बऱ्याच दिवसांनी बंद असल्याचे व त्याचे पत्र्याचे शेड खराब असल्याचे माहिती असतानासुध्दा त्यांनी जाणीवपूर्वक कंपनीच्या पत्र्याच्या शेडवर आनंदला चढायला लावले. शेडमधून पत्रा तुटून अंदाजे ३० फूट उंचीवरून पडून आनंदचा मृत्यू झाला. मात्र या घटनेबाबत श्यामकोरबाईंना शंका असून या सर्वांनीच मुलाला ढकलून दिले असावे, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी योगेश लहाने, सोनू शिंदे, सचिन ढगे, संजय ढगे यांच्याविरुद्ध गन्हा दाखल केला आहे. अधिक तपास

त्यावर तो म्हणाला, की मी मित्रांसोबत इथेच बसत आहे. त्यानंतर आनंद हा बाहेर निघून गेला. त्यानंतर ४ मार्चला पहाटे दोनच्या सुमारास (मध्यरात्री) श्यामकोरबाईंची मुलगी कविता कसबे (वय ३५) व त्यांच्यासोबत नंदाबाई शिंदे, कडूबाई लहाने या तिघी घरी आल्या. त्यांनी सांगितले की आनंदचा अॅक्सिडेंट झाला आहे. तो एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. त्यामुळे श्यामकोरबाई त्यांच्यासोबत एमजीएम हॉस्पिटलला गेल्या. डॉक्टरांनी सांगितले, की आनंदचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे श्यामकोरबाई यांनी सोनू शिंदे याला विचारणा केली असता त्याने सांगितले, की आनंदचा अक्सिडेंट झाला आहे. त्यानंतर योगेश लहाने याला त्यांनी विचारले असता त्याने सांगितले, की आनंद हा आस्मानतारा कंपनीत पत्र्यावर चढला होता. त्याचा पाय घसरून पडल्याने जखमी झाला

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow