गायराण जमिनीतून मोठ्या प्रमाणावर मुरूम चोरीचा प्रकार सुरू असून, स्थानिक शेतकऱ्याने पोकलॅण्ड, जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मदतीने लाखो ब्रास मुरूम उत्खनन करून विक्रीसाठी नेल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

महालपिंप्री (ता. जि. छत्रपती संभाजीनगर
संभाजीनगर) येथे गायराण जमिनीतून मोठ्या प्रमाणावर मुरूम चोरीचा प्रकार सुरू असून, स्थानिक शेतकऱ्याने पोकलॅण्ड, जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मदतीने लाखो ब्रास मुरूम उत्खनन करून विक्रीसाठी नेल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. तसेच, सिंचन तलावात अनधिकृत भराव टाकून तलावाच्या सांडव्यातून जाणारे पाणी अडवल्यामुळे तलाव फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास १८ मार्चपासून गावकरी आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे. याबाबत गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून, संबंधित इसमाने प्रशासनातील अधिकाऱ्यांना मॅनेज केल्याचा दावा करत विरोध करणाऱ्या गावकऱ्यांना धमक्या दिल्याचेही आरोप आहेत. मंडळ अधिकाऱ्यांनी पंचनामा करून काम बंद करण्याचे आदेश दिले होते,
[06/03, 8:40 pm] shabdmat: मात्र उत्खनन अद्याप सुरूच असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. डोंगर फोडल्यामुळे तेथील मुंजा महाराज मंदिरालाही धोका निर्माण झाला असून, धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत, असेही गावकरी सांगतात गावकऱ्यांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करून उत्खनन थांबवावे, संबंधित यंत्रसामग्री जप्त करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच, अनधिकृत प्लॉटिंग थांबवून पर्यावरणीय नुकसान टाळावे, अन्यथा संपूर्ण गाव उपोषणास बसणार आहे. उपोषणकर्त्यांना कोणताही त्रास झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे.
What's Your Reaction?






