राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक वैजापूर तालुका अध्यक्षपदी हसन सैय्यद याची निवड..

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक वैजापूर तालुका अध्यक्षपदी हसन सैय्यद याची निवड..
वैजापूर प्रतिनिधी:-खाजा पटेल
वैजापूर तालूक्यातील लोणी खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार हसन सैय्यद यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक तालूका विधानसभा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे व अल्पसंख्यांक प्रदेशध्यक्ष इद्रीस नाईकवाडे यांच्या मान्यतेने वैजापूर तालुक्यातील अल्पसंख्यांक विभागाच्या विविध पदावरती सामाजिक कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामध्ये डोंगरथडी भागातील लोणी खुर्द येथील रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते ,पत्रकार हसन सैय्यद यांची देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांच्या उपस्थितीत वैजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्यांक विधानसभा अध्यक्षपदी जिल्हाध्यक्ष मोहसीन पटेल यांच्या हस्ते निवड करण्यात आली. या प्रसंगी नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब भोसले, कार्याध्यक्ष दत्तू पाटील वाकलेकर, जिल्हा परिषद सदस्य सुरज नाना पवार, अतुल निकम, आसिफ शेख, ऐराज शेख, रियाज शेख, ऋषी वर्पे, अल्ताफ शेख, ऋषी वाघ, गणेश अनार्थे, अमोल तागड, सुभाष सावंत, अझर शेख, तोशिफ शेख,जुनेद पठाण, कुंडलिक वाडेकर, तैमूर सैय्यद,जगदीश निकम,सोमनाथ तांबे आदींसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले...
What's Your Reaction?






