सामाजिक कार्याचा वसा जपणारे बाबा इनामदार एक आदर्श!.

सामाजिक कार्याचा वसा जपणारे बाबा इनामदार एक आदर्श!
दैनिक शब्दमत शिरूर( पुणे) प्रतिनिधी: शेख शौकत मुजावर
शिरूर तालुक्यातील पाबळ गावचे सुपुत्र बाबा इनामदार यांच्या कार्याची चर्चा तालुका नव्हे तर जिल्ह्यात केली जात आहे.
पाबळ गाव हे दुष्काळजन्य परंतु बाबा इनामदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रेरित होऊन गावातील पाणी प्रश्न दूर व्हावा म्हणून सतत शासन दरबारी पाठपुरावा करत टँकर मुक्त गाव व्हावे म्हणून सदैव प्रयत्न केला आहे.समाजसेवेचा वसा लाभलेले बाबा इनामदार हे सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक, पत्रकारिता क्षेत्रात सतत अग्रेसर समाजातील नागरिकांचे वेगवेगळे प्रश्न सुटावे म्हणून पोलीस प्रशासन, तहसील कार्यालय तसेच विविध जातीचे दाखले मिळावे म्हणून सतत प्रयत्न करत असतात.गावात राम रहीम ही संकल्पना रुजावी म्हणून गणपती मंडळे,रमजान,मोहरम सणात स्वतः युवकांशी संवाद साधत हसतमुखाने आपल्या वकृत्व कलेने तरुणांची मने जिंकत आहेत.
शैक्षणिक क्षेत्रात ते नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून विविध विद्यालयात उपक्रम घेत " शिकाल तर टिकाल"हा नव संदेश देण्याचे काम करतात.पत्रकारिता हा त्यांचा पिंडा असला तरी ते पत्रकारिता आणि समाजकार्याला महत्त्व देणारे नागरिकांना न्याय देणारे एक व्यक्तिमत्व म्हणून ओळख निर्माण करत सर्व पाबळ वासियांच्या गळ्यातील ताईत बनले असुन त्यांच्या कार्याची दखल घेत अनेक सामाजिक संस्थांनी त्यांना पुरस्कार देवून गौरव केलेला आहे.
What's Your Reaction?






