हिंदू सप्ताह निमित्त मुस्लिम बांधवांचे अन्नदान, घडविले एकतेचे दर्शन

हिंदू सप्ताह निमित्त मुस्लिम बांधवांचे अन्नदान, घडविले एकतेचे दर्शन
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क वाळूज प्रतिनिधी इफत इनामदार
वाळूज - येथील मनीषा नगर येथे हनुमान मंदीरात हनुमान जयंती निमीत्त प्रतिवर्षी प्रमाणे त्रिदिनी सप्ताह आयोजीत करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने दर् वर्षी प्रमाणे शनिवार (दिनांक १२) रोजी येथील ग्रामपंचायत सदस्य इस्माईल खान पठाण यांच्या वतीने हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवून आणला आहे. त्यांच्यावतीने दुपारी अन्नदान करण्यात आले . यावेळी परिसरातील शेकडो महिला पुरुष बाल भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शनिवारी ह भ प भागवताचार्य पंढरीनाथ म्हैसमाळे यांचे किर्तन होणार आहे. यावेळी सर्वांनी प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी माजी सभापती मनोज जयस्वाल, उपसरपंच योगेश आरगडे,उपसभापती सचिन काकडे, चेअरमन ज्ञानेश्वर बोरकर , मा चेअरमन सर्जेराव भोंड, अमजद खान पठाण, नदीम झुंबर वाला, पोपट बनकर, दयानंद साबळे, राहुल भालेराव, संदीप तुपे, नंदू भाऊ सोनवणे, सचिन पानकडे , जगन्नाथ आरगडे, साबेर खान ,जुबेर खान, जुनेद खान ,रेहान खान ,अकबर खान, बिलाल बेग,उमर खान,जावेद बेग, रियाज खान पठाण, वाजेद बेग, ज्ञानेश्र्वर घारेगावकर , आप्पासाहेब कोकणे , अमोल खैरनार, बबनराव पुंड, अशोक हिवाळे, विजय काटे, गोरख गवारे, गोपाल मगर, रामकिसन जाधव, बाबासाहेब ठेंग , संभाजी कर्डिले, बाबासाहेब नाचन यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते.
What's Your Reaction?






