दर्गा वर कारवाईच्या अफवेमुळं हिंसाचार ! मोठ्या प्रमाणावर दगडफेक; 20 पोलीस जखमी

 0
दर्गा वर कारवाईच्या अफवेमुळं हिंसाचार ! मोठ्या प्रमाणावर दगडफेक; 20 पोलीस जखमी
दर्गा वर कारवाईच्या अफवेमुळं हिंसाचार ! मोठ्या प्रमाणावर दगडफेक; 20 पोलीस जखमी

Nashik Violence: धार्मिक स्थळावर

कारवाईच्या अफवेमुळं हिंसाचार ! मोठ्या प्रमाणावर दगडफेक; 20 पोलीस जखमी

Nashik Violence: महापालिकेनं न्यायालयाच्या आदेशाने अनधिकृत दर्याला १ एप्रिल रोजी नोटीस बजावली होती.

दरम्यान, महापालिकेनं न्यायालयाच्या आदेशाने अनधिकृत दर्याला १ एप्रिल रोजी नोटीस बजावली होती. या नोटिशीनुसार, स्वताहून हे अनधिकृत बांधकाम काढून घ्या, अन्यथा तोडकामाचा इशाराही देण्यात आला होता. यापार्श्वभूमीवर काल रात्री अचानक लाईट गेल्यानं दर्गा हटवण्यात येणार असल्याची अफवा पसरली.

 Nashik Violence: अनधिकृत धार्मिक स्थळ प्रशासनानं

हटवल्यानं तसंच यासंदर्भात अफवा पसरल्यानं दगडफेकीचा प्रकार नाशिकच्या काठे गल्ली परिसरात घडला आहे. रात्रीच्या वेळी काही समाजकंटकांनी हे कृत्य केलं. या हिंसाचारात अनेक खासगी वाहनांचं नुकसान झालं असून ही परिस्थिती नियंत्रणासाठी आलेल्या पोलिसांवरही दगडफेक झाल्यानं त्यात 20 पोलीस जखमी झाले आहेत.

 नेमकं काय घडलं?

वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत अफवा उडल्यानं तणाव निर्माण होऊन नाशिकच्या काठे गल्ली परिसरात १५ एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी दगडफेकीची घटना घडली. वीजपुरवठा खंडित असल्याचं पाहून जमावानं ही दगडफेक केली. यामध्ये तीन ते चार पोलीस जखमी झाले आहेत तर चार ते पाच वाहनांचं नुकसानही झालं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रात्रीच्या वेळी तब्बल ५०० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मात्र, संतप्त जमावाची संख्या ४०० च्या वर होती. त्यामुळे पोलिसांना देखील ही परिस्थिती नियंत्रणात आणणं कठीण बनलं होतं. या घटनेनंतर नाशिक पोलिसांनी परिसरातील वाहतूक मार्गतही बदल केला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow