बौद्ध तरुणाच्या हत्येचा मास्टरमाईंड बीजेपी युवा नेत्याला अटक करा

 0
बौद्ध तरुणाच्या हत्येचा मास्टरमाईंड बीजेपी युवा नेत्याला अटक करा

बौद्ध तरुणाच्या हत्येचा मास्टरमाईंड बीजेपी युवा नेत्याला अटक करा

पीडित कुटुंबियांचे पोलिस आयुक्त कार्यालयासमोर उपोषण

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क 

छत्रपती संभाजीनगर, दि.२८ बौद्ध युवक कल्पेश रुपेकर याच्या निघृण हत्या प्रकरणात मास्टरमाईंड बीजेपी युवा नेता कुणाल मराठेवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी, या मागणीसाठी

रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या माध्यमातून पोलीस आयुक्त कार्यालयासमोर पीडित कुटुंबातील कविता विजय रूपेकर व अविनाश विजय रूपेकर हे आज शुक्रवारपासून आमरण उपोषणासाठी बसले आहेत. २

फेब्रुवारी २०२५ रोजी मुख्य सूत्रधार बीजेपीचा युवा नेता कुणाल मराठे याच्या सांगण्यावरुन वैभव मालोदे व त्याच्या सहकाऱ्यांनी कल्पेश विजय रूपेकर या तरुणाची क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर निघृणपणे हत्या केली. तसेच कुणाल मराठे हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन कारवाई करताना दिसत नाही. जोपर्यंत कुणाल मराठे याच्यावर गुन्हा दाखल करून

त्याला अटक करण्यात येत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहणार आहे. या वेळी लोकनेते राजूभाई साबळे, राज्याचे उपाध्यक्ष अॅड. अविनाश थिट्टे, राज्य सचिव सुरेश शिनगार, सुनिल कोतकर, सुनिल खरात, शहर प्रमुख रणजीत मनोरे, अर्शद लखपती, प्रकाश घोरपडे, सुधाकर साबळे, राजकुमार अमोलिक, रवी बनसोडे, हन्नु नाना, अनिस भाई, विजय सदावर्ते, विशाल गाडे, विलास साळवे व पीडित कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow