अनुराधा चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी मतदार संघातील लाडक्या बहिणींनीच निवडणूक घेतली हाती

 0
अनुराधा चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी मतदार संघातील लाडक्या बहिणींनीच निवडणूक घेतली हाती

अनुराधा चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी मतदार संघातील लाडक्या बहिणींनीच निवडणूक घेतली हाती 

अनुराधा चव्हाण यांच्या जन आशीर्वाद यात्रेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी

छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवार अनुराधा चव्हाण यांच्या प्रचारार्थ शहरात रविवारी (दि.१६) नोव्हेंबर रोजी मतदारसंघात ठीक-ठिकाणी जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत हजारो महिलांनी सहभागी होत जोरदार घोषणाबाजी करत चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करणार असल्याचे मत व्यक्त केले. या अभूतपूर्व यात्रेमुळे विरोधकांना धडकी भरवली. यावेळी मतदार बंधू भगिनींना शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी मला मतदान रुपी आशीर्वाद द्यावेत असे आवाहन महायुतीच्या अधिकृत उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी मतदारांना केले. 

अनुराधा चव्हाण यांच्या सोबतीला आता फुलंब्री मतदारसंघातील तथा संभाजीनगर शहरातील महायुतीचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने प्रचारासाठी मैदानात उतरले आहे. सकाळच्या सात वाजल्यापासून दिवसभर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील वार्डांमधील विविध भागात घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेत अनुराधा चव्हाण यांना मतदान करा असे आवाहन केले. या जन आशीर्वाद यात्रेस उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांनी दिल्याचे पाहायला मिळाले. 

भाजप शिवसेना महायुतीचे सर्व सेल, सर्व फ्रंटचे कार्यकर्ते यांनी भाजप, शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवार अनुराधा चव्हाण यांच्या उपस्थितीत धनगरवाडी (कुंबेफळ),इंदिरा नगर (कुंबेफळ),करमाड,कोनेवाडी, चिकलठाणा येथून जन आशीर्वाद पदयात्रेला सुरूवात केली. हनुमान मंदिर, चौधरी कॉलनी, जालना रोड, व्यंकटेश हॉटेल, कामगार कॉलनी, महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, महादेव गल्ली माळी गल्ली, सुतार वाडा,अण्णाभाऊ साठे नगर, बेंद्रे नगर, गौतम नगर, हनुमान चौक, जुना बीड रोड, शिवाजी महाराज पुतळा, सावित्री नगर, महादेव मंदिर समारोप करण्यात आला. दुपारच्या सत्रात श्रीराम नगरातील मारुती मंदिर येथून जन आशीर्वाद पद यात्रेस सुरुवात केली. पुढे भगवान बापू घडामोडे यांच्या निवासस्थानापासून संघर्ष नगर गार्डन, विहिरीजवळ, प्रकाश नगर पूर्व, पश्चिम, विठ्ठल चौक, साईबाबा मंदिर, गणपती मंदिर, तोरणागड नगर, चक्रधर स्वामी मंदिर, गुरुमाऊली मेडिकल, हनुमान मंदिर, मूर्तीजापुर चौक, बजरंग नगर, मुकुंदवाडी भागात जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून दौरा करून या यात्रेचा समारोप करण्यात आला.

        

यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट, तालुकाध्यक्ष राधाकिसन पठाडे , मंडळध्यक्ष दीपक खोतकर, अध्यमिक आघाडीचे रामूकाका शेळके, माजी महापौर बापु घडामोडे, गणेश दहीहांडे, विजय औताडे, रामबाबा शेळके,अशोक नाबदे,युवा जिल्हाध्यक्ष सजनराव बागल, भाऊराव मुळे, दत्ता उकर्डे , दिनेश शेळके, अप्पासाहेब शेळके,आशिष जैस्वाल, जगन्नाथ रिठे, रघुनाथ रिठे, मदन नवपुते, संजय चौधरी, रवी गावंडे, सुनील नाडे, गजानन बारबैले आदींसह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने या जन आशीर्वाद यात्रेत सहभागी झाले होते 

शहरातील वार्डात जन आशीर्वाद यात्रेनिमित्त अनुराधा चव्हाण यांचे आगमन होताच स्थानिक नागरिकांनी मोठ्या जल्लोषात कुठे बँड लावून, कुठे फटाके फोडून तर कुठे महिला भगिनींच्या हस्ते औक्षण करून अनुराधा चव्हाण यांचे जोरदार स्वागत केले. वार्डात आगमन होताच अनुराधा चव्हाण यांनी त्या त्या भागातील महापुरुषांच्या स्मारकांना अभिवादनही केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow