धक्कादायक... छ. संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांचा पत्नीकडून छळ, अपमानास्पद वागणूक, दुसऱ्याशी मध्यरात्री चॅटिंग करताना पकडली गेली होती, अघोरी विद्येचा

धक्कादायक... छ. संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांचा पत्नीकडून छळ, अपमानास्पद वागणूक, दुसऱ्याशी मध्यरात्री चॅटिंग करताना पकडली गेली होती, अघोरी विद्येचा
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) :
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगरचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र तुकाराम कटके (रा. जालाननगर) यांचा पत्नीने तिचा मित्र आणि माहेरच्यांच्या मदतीने छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यरात्री पत्नीला कुणाशी तरी चॅटिंग करताना पकडल्यानंतर हा छळ टोकाला गेला. ती कटके यांना अपमानास्पद वागणूक द्यायची. त्यांच्या हत्येसाठी मित्राच्या मदतीने अघोरी विद्या करायची. सातारा पोलिसांनी पत्नी, तिचा मित्र, सासू, मेहुण्यासह इतर सहा जणांविरुद्ध अॅट्रॉसिटी व जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पत्नी, मेहुणा आणि पत्नीच्या मित्राला अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मध्यरात्री कुणाशी तरी चॅटिंग करताना पकडली...
२०१५ मध्ये दिवाळीत मध्यरात्री पत्नी कोणाशी तरी चॅटिंग करत असताना कटके यांना दिसले. त्यांनी तिच्या आई व भावाला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर समजूत घालून हे प्रकरण मिटले. २०१९ मध्ये कटके हे मुंबईत नोकरीला असताना पत्नी व त्यांचा एक मुलगा छत्रपती संभाजीनगरमध्येच राहत होते. २०२१ मध्ये सारिकाने बोरखडी (जि. जालना) ग्रीनलँड स्कूल सुरू केली. त्याठिकाणीच विनोद उबाळेचे हॉटेल होते.
पत्नीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह छायाचित्रे
पत्नीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह छायाचित्रे आणि रेकॉर्डिंग आढळल्याचे कटके यांनी तक्रारीत म्हटले आहे. विनोद उबाळेला अघोरी विद्या येते. तो पत्नीच्या संगनमताने ही अघोरी विद्या कटके यांच्यावर वापरत होता. अघोरी विद्येमधून कटके यांचा खून करण्याचा कट रचून त्यादृष्टीने त्यांनी जादूटोणाही केल्याचे तक्रारीत कटके यांनी म्हटले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयितांना अंमलीपदार्थ विरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विशाल बोडखे, प्रवीण वाघ यांनी अटक केली. अधिक तपास सहायक पोलीस आयुक्त रणजीत पाटील करीत आहेत.
: विनोद उबाळे (रा. जालना), पत्नी सारिका देवेंद्र कटके, सासू सुवर्णा साहेबराव देशमुख, मेहुणा आतिश देशमुख (रा. सोनारी, ता. परंडा, जि. धाराशिव), घरातील कामगार छायाबाई बालाजी गायकवाड व शाळेतील कामगार संगीता (पूर्ण नाव माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. विनोद उबाळे, सारिका व आतिष यांना अटक करण्यात आली आहे.
X
What's Your Reaction?






