डॉ. दिनेश परदेशी शिवबंधनात, "मातोश्री" निवासस्थानी शिवबंधन बांधून घेतला पक्षात प्रवेश
डॉ. दिनेश परदेशी शिवबंधनात, ''मातोश्री'' निवासस्थानी शिवबंधन बांधून घेतला पक्षात प्रवेश
वैजापूर: दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
भारतीय जनता पक्षाला सोडचिट्टी देत डॉ. दिनेश परदेशी यांनी दिनांक २५ सप्टेंबर रोजी हाती शिवबंधन बांधले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी "मातोश्री" निवासस्थानी डॉ. दिनेश परदेशी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह उद्धव सेनेत बुधवारी दुपारी एक वाजता मातोश्रीवर प्रवेश केला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, मा. खा.विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर, मा. जिल्हा परिषद सदस्य अविनाश गलांडे, मनाजी मिसाळ, शिवसेना (उद्धव ठाकरे) सेनेचे तालुका प्रमुख सचिन वाणी, शहर प्रमुख प्रकाश पा. चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा वैजापूर नगर परिषदेचे मा. नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांचा गेल्या दोन तीन महिन्यापासून बहुचर्चित असलेला पक्षप्रवेश अखेर बुधवारी मुंबईतील उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी पार पडल्याने आता या पक्षप्रवेशांच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. डॉ. दिनेश परदेशी यांच्या या पक्षप्रवेशामुळे वैजापूर तालुक्यात भाजपला खिंडार तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला खरा वाघ मिळाला आहे. या पक्ष प्रवेशाने येणाऱ्या काळात वैजापूर विधानसभेची निवडणूक मात्र चुरशीची होईल यात तिळमात्र शंका नाही.
वैजापूर गंगापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी तालुक्यात विकास व्हावा यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करावा असा आग्रह धरला होता. कार्यकर्त्यांच्या आग्रह खातिर आणि वैजापूर तालुक्याचा लोकनेते स्वर्गीय आर एम वाणी यांच्या संकल्पनेतील तालुका घडविण्यासाठी शिवसेना पक्षात प्रवेश केला तसेच मला एक हजार कोटी मिळाले तरी मी ठाकरे घरण्याशी गद्दारी करणार नाही असे डॉ. परदेशी म्हणाले.
यावेळी प्रवीण भाडाईत सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शिवाजी आधुडे
माजी सभापती पंचायत समिती, वैजापूर, पुंजाराम भोपळे सरपंच भोकरगाव, मा. नगरसेवक दिनेश राजपूत, राजेश गायकवाड, रियाज अकील शेख, गणेश खैरे, बजरंग मगर, इम्रान कुरैशी, मा.प.स.सभापती सारंगधर आबा डिके, सरपंच भीमराव जाधव, रोहित तांबे, रजनीकांत नजन संचालक बाजार समिती, बाबासाहेब पाटील, मधुकर पवार, बद्री गायकवाड, रावसाहेब जगताप मा. संचालक, सुभाष आव्हाळे सर, दिगंबर खंडागळे, वाजेद कुरैशी, मा.नगरसेवक सय्यद हिकमत काका, वाल्मीक मोटे मा. पंचायत समिती सदस्य, उत्तम पवार, नवनाथ आढाव उपसरपंच व पूर्व ग्रामंचायत सदस्य, रामेश्र्वर जाधव ग्रामंचायत सदस्य, सुनील शिरोडे शिऊर, शेख जहीर ग्रामंचायत सदस्य, संतोष तुपे, योगेश सूर्यवंशी, शिवाजी गोटे, पुंजाहरी भोपळे, सुनिल बोडखे, ज्ञानेश्वर मतसागर, समीर सय्यद, फैजान शेख, फरहान शेख, समीर शेख, अल्तमश शेख, कलीम शेख, दादा मिस्त्री, पंकज मतसागर, सुदाम भडके सरपंच वाहेगाव, सचिन चिंतामणी सुभाष आबा धोत्रे मा. सभापती, बाबासाहेब जगताप, बबनराव म्हस्के, जावेद पटेल, अजित राजपूत, भूषण राजपूत, प्रताप बोर्डे मा. सभापती बाजार समिती, प्रभाकर बारसे मा. पंचायत समिती वैजापूर, सखाहरी चरणे मा. सरपंच, शिवाजी काळे मा. जिल्हा परिषद सदस्य, गणेश तांबे चेअरमन नागमठाण, सुरेश राऊत सदस्य पंचायत समिती वैजापूर, गुलाब भाई, कृष्णा जाधव, कारभारी पाटील कराळे मा. सरपंच, अनिल साठे, प्रवीण तांबे, पांडुरंग सूर्यवंशी सरपंच बळेगाव, संतोष गायके मा. संचालक बाजार समिती, काकासाहेब गोटे माजी सरपंच व चेअरमन, भीमराव जाधव सरपंच, सोमनाथ मगर करंजगाव, ॲड. मजहर बेग, अल्ताफ बाबा, यासेर चाऊस, फेरोज भाईजान, फेरोज पठाण, शिवा भाऊ थोरात, रफीक शेख, रशीद शेख, अमर चाऊस, आसेफ पठाण, आदिल चाऊस ,मोहसीन शेख, सचिन राऊत, साबेर पठाण साहिल बॅटरी, यासीन शाह, लतिफ शेख, राजा कुरैशीमसूद शेख, अतिक शेख ऊर्फ अत्तू,अकलाख सौदागर, सह हजारो कार्यकर्त्यांनी या पक्षात प्रवेश केला.
कॉलम
पक्षप्रवेशानंतर कार्यकर्त्यांकडून डॉ.परदेशी यांचा भव्य स्वागत सोहळा संपन्न
मुंबई येथे मातोश्रीवर प्रवेश घेतल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा मा. नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांचे वैजापूर शहरात दिनांक 26 गुरुवार रोजी सायंकाळी चार वाजता येवला नाका येथे आगमन झाले व
त्यानंतर लोकनेते स्वर्गीय आर.एम.वाणी यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन, शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या भव्य स्वागत सोहळ्याचा समारोप डॉ.परदेशी यांच्या निवासस्थानी कऱण्यात आले या वेळी तालुक्यांतील हजारो नागरिकांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?






