छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतरस्त्यांसाठी यशस्वी पेरू वाटप आंदोलन
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतरस्त्यांसाठी यशस्वी पेरू वाटप आंदोलन
निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी आंदोलकांचे निवेदन,पेरू स्वीकारत तहसिल कार्यालयांना महाराजस्व अभियान राबवण्याचे परिपत्रक जाहिर केले
*चौकट~ जिल्हाधिकार्यांना आंदोलकांनी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांकडून शिव पानंद शेतरस्त्यांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असुन उच्च न्यायालयाच्या आदेशासह शासनिर्णयाची अमलबजावनी करण्यात यावी यावर जिल्हाधिकार्यांनी आंदोनकर्त्यांना न्याय देण्यासाठी ठोस भुमिका घेतली परंतु प्रत्यक्ष कार्यवाही न झाल्यास राज्यभर शेत तिथे रस्ता अभियानाची जागृती करून राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातुन पुढील लढा मंत्रालयावर - शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे*
*चौकट- महाराष्ट्रातील एकही शेतकरी शेतरस्त्यापासून वंचित राहणार यासाठी राज्यव्यापी जनआंदोलन उभारून प्रत्यक्ष शेवटच्या शेतकऱ्याला शेतरस्ता मिळवून देण्यासाठी निस्वार्थ लढा देणार- महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता जिल्हा समन्वयक दादासाहेब जंगलेपाटील*
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवपानंद शेतरस्ते चळवळीच्या वतीने पेरू वाटप आंदोलन करण्यात आले त्यावेळी माननीय उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना शेतरस्ते खुले करण्यासाठी जाहीर निवेदन देवून चर्चा करण्यात आली व पेरू देत शेतकऱ्यांच्या पेरू आंदोलनाकडे लक्ष वेधन्यात आले तालुक्यातील सर्व वहिवाटीच्या रस्त्यांचे सर्वेक्षण करून त्याच्या नोंदी गाव नकाशावर घेण्यात याव्यात,वाटपपत्रात शेतरस्ता सक्तीचा करावा,शासन निर्णयाप्रमाणे मोजणी शुल्क व पोलीस संरक्षण फी बंदची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी,शिव पानंद शेतरस्त्यांच्या हद्दीसाठी नंबरी लावुन त्यांचे नियोजित सर्वेक्षण करून नंबरी हटवणार यांना दंड सुरू करा ,शेतरस्त्याअभावी पडीक राहणाऱ्या शेत जमीन धारकांना विना अट नुकसान भरपाई देण्यात यावी त्याचबरोबर शिव रस्ते अतिक्रमण असल्यामुळे वाहतुकीयोग्य नसल्याने शेतकऱ्यांना शेतीमध्ये वखरणी पेरणी मशागत व पेरणी कापणी उत्पादित पिक वाहतूक यासाठी यंत्रसामुग्री ट्रॅक्टर ट्रक ऊसाची ट्रक बैलगाडी टेम्पो इत्यादी साधने शेतात नेणे आणणे अवघड होत चालली आहे शेतकऱ्यांनी यापूर्वी प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदाराकडे शेती रस्त्यासाठी विनंती अर्ज दाखल केलेले आहेत परंतु तहसीलदार कोणत्या प्रकारची निर्णय देत नाहीत महसूल अधिनियम 1966 च्या 143 कलम नुसार तहसीलदारांनी रस्ता उपलब्ध करून देणे आवश्यक आहे परंतु
तरीही संबंधित तालुक्याच्या तहसीलदार शिव पानंद शेत रस्त्यांच्या हदद निश्चित करून शेतरस्ते खुले करत नाहीत म्हणून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मध्ये जनजागृती करत जिल्हाधिकारी अहमदनगर कार्यालयावर २७ सप्टेंबर रोजी पेरू वाटप आंदोलन केले शेत व शिवपानंद रस्त्याच्या समस्या निवारणासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विशेषतः कन्नड, वैजापूर, सिल्लोड, खुलताबाद, पैठण, गाणगापूर, शेगाव, आदी तालुक्यातील शेतकरी या शेतरस्त्यांच्या पेरू आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद रस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगलेपाटील, व छ.स जिल्ह्यातील तरुण बत्तासे,चंदन बेडवाळ,असुद्दीन काझी, रविंद्रबाप्पू सानप, सचिन शेळके, राजूभाऊ राजपूत,शंकर बेडवाल, अहमद शेख, ,जगन्नाथ कणसे, शहाबाद पठाण,सुखदेव कदम, दादा राऊत, अजित चव्हाण,प्रभाकर गायकवाड आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?






