राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या प्रदेश सचिव पदी अनवर नवाब

 0

 

राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या प्रदेश सचिव पदी अनवर नवाब

मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनवर नवाब यांची महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे,सदरील नियुक्ती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांनी आमदार जयंत पाटील यांच्या मान्यतेने मुंबई येथील राष्ट्रवादी भवन येथे केली आहे.आगामी काळात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांनी अनवर नवाब यांची निवड केली आहे.पक्षाचे संघटन बळकट करण्यासाठी अनवर नवाब यांना जबाबदारी देण्यात आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष खाजा शरफोद्दीन यांनी सांगितले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील,शहर कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख,अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष शेख शफिक, राष्ट्रवादी प्रदेश युवक सचिव आशिष पवार,अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष रज्जाक पठाण,जिल्हा कार्याध्यक्ष सैय्यद लायकोद्दीन,शहर उपाध्यक्ष समीर मिर्झा, राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, कार्याध्यक्ष फारूक शेख, युवक उपाध्यक्ष अश्फाक जमील खान, आदिंसह पदाधिकाऱ्यांनी अनवर नवाब यांच्या निवडीचे स्वागत केले तसेच पुष्पगुच्छ व शाल भेट देऊन सन्मानित केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow