महाराष्ट्र कामगार विकास संघटनेचा प्रदीप जैस्वाल यांना जाहीर
महाराष्ट्र कामगार विकास संघटनेचा प्रदीप जैस्वाल यांना जाहीर पाठिंबा, शेकडो कामगारांची उपस्थिती
महाराष्ट्र कामगार विकास संघटनेने आज मध्य मतदारसंघाचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना जाहीर पाठिंबा दिला. या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत जैस्वाल यांच्या प्रचाराला एक नवा बळ मिळाले आहे. संघटनेच्या कार्यकर्ता आणि कामगारांमध्ये या पाठिंब्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे.
या बैठकीसाठी शेकडो कामगार उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष रामकिशन शेळके यांनी या प्रसंगी आपल्या भाषणात प्रदीप जैस्वाल यांच्या कामगारांसाठी केलेल्या समर्पित कार्याची प्रशंसा केली. त्यांनी सांगितले, “प्रदीप जैस्वाल हे केवळ एक उमेदवार नाहीत, तर ते एक नेते आहेत जे आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणात कामगार, कष्टकरी आणि सामान्य माणसांच्या हक्कांसाठी लढत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने कामगार वर्गाच्या हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. यामुळेच आज या संघटनेने प्रदीप जैस्वाल यांना आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.” बैठकीदरम्यान, प्रदीप जैस्वाल यांनी कामगारांशी संवाद साधताना त्यांना विश्वास दिला की, "माझ्या प्रचाराचा मुख्य उद्देश तुमच्या हक्कांसाठी लढणे, तुमच्यासाठी उत्तम कार्य करण्याचा आहे. मी तुमच्यासोबत आहे आणि सदैव तुमच्या कल्याणासाठी काम करेन, तसेच संघटनेने दिलेल्या पाठिंब्या बद्दल प्रदीप जैस्वाल यांनी संघटनेचे आभार मानले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष रामकिशन शेळके, आढे सरकार, परसराम काळे, दीपक वाणी, शुभम गोर्डे, अशोक नाडे, शहा सर, लक्ष्मण जंजिरे, योगेश जाधव, रामदास नानवटे, प्रवीण देशमुख, उत्तम लोहकरे, कल्याण आगळे, अभिजीत देशपांडे, विष्णू रेवगडे, भाऊसाहेब टाके, संजय सोनवणे, आशिष धुमाळ, सतीश पाटील, भरत नाईकवडे, एकनाथ ढाकणे, सोमनाथ गायकवाड, योगेश बचाटे, निलेश भारंबे, ऋषीं लघणे, दिनेश भोपळे, रवींद्र लहूगळे यांच्यासह संघटनेचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगार उपस्थित होते.
What's Your Reaction?






