मनपाला वाहने खरेदीसाठी 61 कोटींचा निधी, मा पालकमंत्री

 0
मनपाला वाहने खरेदीसाठी 61 कोटींचा निधी, मा पालकमंत्री
मनपाला वाहने खरेदीसाठी 61 कोटींचा निधी, मा पालकमंत्री

मनपाला वाहने खरेदीसाठी 61 कोटींचा निधी, मा पालकमंत्री 

मनपा, दि 16 ऑगस्ट: महापालिकेला शहर स्वच्छ ठेवण्यास वाहने खरेदी करण्यासाठी एकूण 61 कोटीच्या निधी देण्याचे आश्वासन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. श्री अब्दुल सत्तार यांनी दिले. स्वातंत्र दिनाचा औचित्य साधून दिनांक 15 ऑगस्ट रोजी मा. पालकमंत्री यांच्या हस्ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान येथे 15 वा वित्त आयोगातून खरेदी करण्यात आलेले एकूण 20 वाहनांचे उद्घाटन करण्यात आले, याप्रसंगी त्यांनी ही घोषणा केली.

 महापालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांचे कौतुक करताना मंत्री महोदय म्हणाले की प्रशासक नागरिक, उद्योजक व शहराच्या विकासात हातभर लावणारे प्रत्येक घटकावर लक्ष ठेवतात. त्यांची कामाची तळमळ खूप आहे ते सकाळी लवकर उठून कामावर लागतात. आपल्या शहराला इंदोर सारखा स्वच्छ करण्याचा संकल्प आता प्रशासकांनी घेतला आहे आणि या लक्षात ते यशस्वी होतील अशी मी आशा बागडतो आणि त्यांना यासाठी हवी ती मदत करायला मी पालकमंत्री या नात्याने सदैव तयार आहे, ते म्हणाले. यावेळी मंत्री महोदयांनी महापालिकेतील वाहनांचे नियोजन करण्यासाठी फ्लीट मॅनेजमेंट ॲप, पाण्याची लाईन मध्ये चोकअप शोधणे व पाण्याची चोरी थांबण्यासाठी इंडोबोट तंत्रज्ञान तसेच नवीन पाणीपुरवठा योजना आणि बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान या कामात प्रशासकांची तळमळ आणि त्यांची काम करण्याची पद्धत चे कौतुक केले. ते म्हणाले की नवीन पाणीपुरवठा योजनेत महापालिकेच्या 822 कोटी रुपयांचा हिस्सा शासनाने दिला आहे याशिवाय अजून वाहने खरेदी करण्यासाठी मी 61 कोटीच्या निधी देण्याच्या आश्वासन यावेळी देतो.

 सदरील कार्यक्रमाचे प्रस्ताविक शहर अभियंता ए बी देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) अमोल कुलकर्णी यांनी केले. आपले मनोगत व्यक्त करताना प्रशासक जी श्रीकांत यांनी मंत्री महोदयांना गरवारे येथील रात्रीच्या वेळेस क्रिकेट खेळण्यासाठी लावण्यात आलेले फ्लड लाईट्स, महापालिकेतील विविध विभागात प्रस्तावित अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जसे की फ्लीट मॅनेजमेंट ॲप, स्मार्ट सिटी बस तिकिट डिजिटल पेमेंट मध्ये घेणे, महास्वच्छता अभियान आणि आम्हाला खेळू द्या इत्यादी योजना व मोहिमेबाबत मंत्री महोदयांना माहिती दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow