पोलीस अधीक्षक यांचे संकल्पनेतुन जिल्हयातील शालेय स्तरावर दामिनी पथकाचे माध्यमांतुन विद्यार्थीविद्यार्थीनी सुरक्षा कार्यशाळाचे आयोजन करण्यात येत आहे.

 0
पोलीस अधीक्षक यांचे संकल्पनेतुन जिल्हयातील शालेय स्तरावर दामिनी पथकाचे माध्यमांतुन  विद्यार्थीविद्यार्थीनी सुरक्षा कार्यशाळाचे आयोजन करण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक यांचे संकल्पनेतुन जिल्हयातील शालेय स्तरावर दामिनी पथकाचे माध्यमांतुन  विद्यार्थीविद्यार्थीनी सुरक्षा कार्यशाळाचे आयोजन करण्यात येत आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण 

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क 

शालेय व महाविद्यालयीन मुलींच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोनातुन तसेच बाल लैगिंक अत्याचारा विषयीच्या घटनाचे अनुषंगाने शालेय मुले व मुलींना चांगल्या व वाईट स्पर्शाबद्दल व्यापक स्वरूपात माहिती व्हावी या हेतुने मा. डॉ. विनयकुमार राठोड, पोलीस अधीक्षक यांचे संकल्पनेतुन जिल्हयातील शालेय स्तरावर दामिनी पथकाचे माध्यमांतुन विद्यार्थी/विद्यार्थीनी सुरक्षा कार्यशाळाचे आयोजन करण्यात येत आहे. 

 या अनुषंगाने आज दिनांक 23/8/2024 रोजी सकाळी 10:00 वाजेला पोलीस ठाणे करमाड हद्यीतील चैत्यन व्हॅली इंटरनॅशनल स्कुल, करमाड येथे सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील इयत्ता 01 ते 04 थी वर्गातील विद्यार्थी, शिक्षक, शालेय बस चालक, वाहक, सफाई कर्मचारी, असे 250 जणांची उपस्थितीती होती.

 याप्रसंगी दामिनी पथकाचे प्रमुख सपोनि आरती जाधव व सपोनि प्रताप नवघरे, पो.स्टे. करमाड यांनी विद्यार्थीशी संवाद साधुन मुलांनी चांगला व वाईट स्पर्श कसा ओळखावा याबाबत सखोल माहिती दिली तसेच मुलांचे लक्षात येईल याकरिता शॉर्ट फिल्मच्या माध्यमांतुन त्यांना समजावुन सांगितले आहे तसेच शाळेत ये -VÉÉ करण्याकरिता मुले स्कुल बस किंवा खाजगी वाहनाने प्रवास करतात, यादरम्यान त्याचे सोबत ओळखीचा कोणी व्यक्ती गैरवर्तन करत असेल तसेच शाळेत आल्यानंतर शाळेच्या परिसरात वावरतांना जर कोणताही व्यक्ती हा त्यांचेशी गोड बोलुन, वाईट हेतुने स्पर्श करत आहे किंवा पाठलाग करतो, कोणत्याही प्रकारचे आमिष किंवा कुटूंबातील इतर व्यक्तींना इजा करण्याबद्दल भिती दाखवुन जवळीक साधुन त्रास देत असेल तर अशा गोष्टी सहन न करता मुलींनी किंवा मुलानी न घाबरता सर्वांत प्रथम याबाबत माहिती ही आई-वडील किंवा शिक्षक तसेच जवळच्या मित्र/मैत्रिणीला तात्काळ सांगितली पाहिजे. आपली बदनामी होईल या भावनेतुन जर कोणी तक्रार केली नाही तर समोरच्या व्यक्तीची हिम्मत अधिक स्वरूपात वाढु शकते.   

 शाळा प्रशासनाने स्कुलबसवरिल चालक, व मदतनिस यासह इतर कर्मचारी यांची संपुर्ण माहिती ठेवुन त्यांची चारित्र्य पडताळणी करूनच त्यांना नौकरीवर ठेवणे अत्यावश्यक आहे. तसेच त्याचे वर्तनाबाबत मुलांशी संवाद साधुन वेळोवेळी माहिती घेणे आवश्यक आहे. ज्यामुळे मुले ही त्याचे वर्तनाबाबत न भिता बोलु शकतील. ज्यामुळे शाळेचे परिसरातील वातावरण सुरक्षित ठेवणे शक्य होईल.  

तसेच मुलींनी कोठेही एकटी वावरतांना अचानक काही प्रसंग उद्भवल्यास तातडीच्या मदती करिता डायल 112 तसेच पोलीस नियंत्रण कक्ष क्रमाकं 0240-2381633 तसेच चाईल्ड हेल्प लाईन क्रमांक 1098 तसेच दामिन पथक हेल्प लाईन क्रमांक 9529659983 या क्रमांकावर संपर्क साधावा.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow