चिकलठाण्यातील काळे बंधू हॉटेलमध्ये राडा; महिलांना पाहून लघुशंका करणाऱ्या तरुणांना वॉचमननी सुनावताच चौघांचा थयथयाट; वेटर्सना बेल्ट, दगडाने मारहाण

 0
चिकलठाण्यातील काळे बंधू हॉटेलमध्ये राडा; महिलांना पाहून लघुशंका करणाऱ्या तरुणांना वॉचमननी सुनावताच चौघांचा थयथयाट; वेटर्सना बेल्ट, दगडाने मारहाण

चिकलठाण्यातील काळे बंधू हॉटेलमध्ये राडा; महिलांना पाहून लघुशंका करणाऱ्या तरुणांना वॉचमननी सुनावताच चौघांचा थयथयाट; वेटर्सना बेल्ट, दगडाने मारहाण

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) :

चिकलठाण्यातील काळे बंधू हॉटेलमध्ये चार तरुणांनी राडा केला. आधी वॉचमन आणि नंतर वेटर्सला बेल्ट, दगडांनी बेदम मारहाण केली. हॉटेलमधून जेवण करून बाहेर पडलेल्या महिलांकडे पाहून हे तरुण लघुशंका करत होते. त्याबद्दल महिलांनी सांगितल्याने वॉचमनने चौघांना सुनावले. त्याचा राग येऊन चौघांनी हा राडा केला. ही घटना गुरुवारी (२१ मार्च) रात्री ११ ला घडली.

मच्छिंद्र देविदास खराटे (वय ३१, रा. भिष्मेश्वर कॉलनी, मयूर पार्क, टीव्ही सेंटर) याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो चिकलठाण्यातील काळे बंधू हॉटेलमध्ये १५ वर्षांपासून वेटर आहे. गुरुवारी (२१ मार्च) रात्री ११ ला तो हॉटेलवर असताना हॉटलबाहेर पार्किंगजवळ त्याला वॉचमन गंगाधर लक्ष्मण जाधव यांचा ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे खराटे व हॉटेलमधील इतर वेटर तात्काळ त्या ठिकाणी पळत गेले. तेथे चार जण हे वॉचमन जाधव यांना मारहाण करत होते. जाधव यांना काय झाले याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या काही महिला जेवण करून बाहेर जात असताना पार्किंगजवळ चार जण होते. त्यापैकी दोघे त्या महिलांसमक्ष हॉटेलसमोरील बाजूस लागून असलेल्या पार्किंगमध्ये लघवी करत होते. त्यामुळे महिलांनी माझ्याकडे त्याबाबत तक्रार केली. त्यामुळे मी त्यांना त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली, असे सांगितले.

X

[23/03, 5:22 pm] shabdmat: हे ऐकून वेटर खराटे आणि अन्य वेटर्सनी मारहाण करणाऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी काही एक न ऐकता सर्व वेटर्सनाही शिवीगाळ करून त्यापैकी एक व्यक्ती ज्याच्या अंगात पांढरा शर्ट व काळी पँट होती त्याने बेल्टने व लाल शर्ट घातलेल्या व्यक्तीने दगडाने मारहाण करून खराटे यांना जखमी केले. त्यापैकी दोघे तेथून पळून गेले. हा राडा सुरू असतानाच गस्तीवरील पोलिसांची गाडी तेथे आली. त्यांनी मारहाण करणाऱ्यांपैकी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे अनिल गणपत इंगोले (वय २२, व्यवसाय शिक्षण रा. सावित्रीनगर, चिकलठाणा), राजेश शिवाजी म्हस्के (वय २४, रा. सावित्रीनगर, चिकलठाणा) असे सांगितले. पोलिसांनी अनिल इंगोले याच्याकडे पळून गेलेल्या दोघांबद्दल विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे रामेश्वर दत्तू गिरी व कृष्णा रामदेव दिंडे असे सांगितली. या प्रकरणात सिडको एमआयडीसी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार साहेबखान

पठाण करत आहेत. दरम्यान, संशयित तरुणांनी पोलीस ठाण्यातही धिंगाणा घातला. सोडून देण्याची मागणी करत टेबलवर असलेली स्टिलची बाटली स्वतःच्या डोक्यावर मारून घेतली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow