हिना नगर ते सावंगी बायपास रस्त्याचे काम सोमवारपर्यंत काम सुरू न झाल्यास मनपा आयुक्त जी श्रीकांत व शहर अभियंता देशमुख यांना काळेफासणार

हिना नगर ते सावंगी बायपास रस्त्याचे काम सोमवारपर्यंत काम सुरू न झाल्यास मनपा आयुक्त जी श्रीकांत व शहर अभियंता देशमुख यांना काळेफासणारहिना नगर ते सावंगी बायपास रस्त्याचे काम सोमवारपर्यंत काम सुरू न झाल्यास मनपा आयुक्त जी श्रीकांत व शहर अभियंता देशमुख यांना काळेफासणार
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर – हिनानगर जालना रोड ते सावंगी बायपास या रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्याचे काम मंजूर होऊनही सहा महिन्यांपासून थांबले आहे. यासाठी आवश्यक निधीही मंजूर करण्यात आला असतानाही महानगरपालिका या कामाकडे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी, स्थानिक नागरिकांना अपघात आणि दैनंदिन हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी साचून मोठ्या प्रमाणात चिखल होत आहे. त्यामुळे गाड्या घसरून अपघात होत आहेत, तर महिला आणि शाळकरी मुलांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. या रस्त्याच्या कामास तातडीने सुरुवात करावी, अन्यथा सोमवार, दिनांक 7 एप्रिल 2025 पर्यंत जर काम सुरू झाले नाही, तर आयुक्त जी. श्रीकांत आणि शहर अभियंता देशमुख यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, त्यांनी प्रशासनाकडून त्वरित कार्यवाहीची मागणी केली आहे. लवकरच रस्त्याच्या कामास सुरुवात न झाल्यास काळे फासण्यासारख्या आंदोलनात्मक पद्धतींचा अवलंब केला जाईल, असे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे.
या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या कामास तातडीने सुरुवात न केल्यास आयुक्त जी श्रीकांत व शहर अभियंता देशमुख यांच्या तोंडाला काळेफासणार असा इशारा आंदोलन कर्ते आजमत पठाण यांनी दिला आहे
What's Your Reaction?






