विरोधात पोस्ट टाकल्याने जलील समर्थकांकडून मंत्री शिरसाट समर्थक युवकाला बेदम मारहाण !

विरोधात पोस्ट टाकल्याने जलील समर्थकांकडून मंत्री शिरसाट समर्थक युवकाला बेदम मारहाण !
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मंत्री संजय शिरसाट यांच्यावर माजी खासदार इम्तियाज जलील हे जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचे आरोप लावत आहेत. दोघांतील युद्ध आता कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले असून, जलील यांच्याविरुद्ध पोस्ट का टाकली, असे विचारून २७ वर्षीय युवकाला जलील समर्थकांनी बेदम मारहाण केली. त्याला वाचवायला मध्ये पडलेल्या त्याच्या कुटुबीयांनाही मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
आज तुला जीवे मारून टाकतो... शिरसाट तुझा XX आहे का, असे म्हणून त्यांनी चाबुकस्वार यांना हाताचापटाने तोंडावर, छातीवर, बरगड्यावर, हाताचापटाने व लाथाबुक्क्याने मारहाण सुरू केली. त्यानंतर आई शांताबाई दिलीप चाबुकस्वार, पुतण्या शुभम भीमराव अंगुरे, मावस भाऊ भीमराव धोंडीबा अंगुरे, लहान भाऊ अजय चाबुकस्वार हे भांडण सोडवण्यासाठी व समजावून सांगण्यासाठी आले असता विशाल खोतकर, महेश खोतकर, रोहित खोतकर हे सुध्दा आले. त्यांनी शांताबाई यांना छातीवर, ओटीपोटावर लाथाबुक्क्याने मारहाण केली व अश्लील शिवीगाळ केली. शुभम अंगुरे, भिमराव अंगुरे, अजय यांनाही अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली.
जीवे मारण्याची धमकी दिली.
आज तुला जीवे मारून टाकतो... शिरसाट तुझा XX आहे का, असे म्हणून त्यांनी चाबुकस्वार यांना हाताचापटाने तोंडावर, छातीवर, बरगड्यावर, हाताचापटाने व लाथाबुक्क्याने मारहाण सुरू केली. त्यानंतर आई शांताबाई दिलीप चाबुकस्वार, पुतण्या शुभम भीमराव अंगुरे, मावस भाऊ भीमराव धोंडीबा अंगुरे, लहान भाऊ अजय चाबुकस्वार हे भांडण सोडवण्यासाठी व समजावून सांगण्यासाठी आले असता विशाल खोतकर, महेश खोतकर, रोहित खोतकर हे सुध्दा आले. त्यांनी शांताबाई यांना छातीवर, ओटीपोटावर लाथाबुक्क्याने मारहाण केली व अश्लील शिवीगाळ केली. शुभम अंगुरे, भिमराव अंगुरे, अजय यांनाही अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली.
What's Your Reaction?






