वेरुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र 'रामभरोसे'; मृतदेहावर शवविच्छेदनासाठी डॉक्टर गायब..! दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

वेरुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ‘रामभरोसे’; मृतदेहावर शवविच्छेदनासाठी डॉक्टर गायब..!
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
खुलताबाद
तब्बल तीन तासांपासून मृतदेह शवविच्छेदनगृहात पडून; नातेवाईकांचा आक्रोश
खुलताबाद तालुक्यातील पळसगाव येथील बाबासाहेब दशरथ भोसले यांनी वैयक्तिक कारणास्तव स्वतःला जाळून आत्महत्या केली. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी वेरुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र, या केंद्रात कार्यरत असलेले दोन्ही वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याचे समोर आले आहे.या निष्काळजीपणामुळे मृतदेह तब्बल तीन तासांपासून शवविच्छेदनगृहात पडून असून नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये संतापाची वातावरण निर्माण झाले आहे. गावचे सरपंच संदीप काळे, उपसरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने आरोग्य केंद्रात उपस्थित असून*
डॉक्टरांच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, इतका वेळ उलटूनही एकही वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाला नाही.या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेतील हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला असून, नातेवाईकांचा आक्रोश आणि ग्रामस्थांचा रोष वाढत आहेया बाबीकडे वरिष्ठ अधिकारी ने तात्काळ दखल घेण्याची गरज आहे
What's Your Reaction?






