राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग जिल्हा कार्याध्यक्ष पदी सैय्यद लायकोद्दीन
राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग जिल्हा कार्याध्यक्ष पदी सैय्यद लायकोद्दीन
औरंगाबाद:दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
दौलताबादचे समाजसेवक सैय्यद लायकोद्दीन यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष अल्पसंख्यांक विभाग छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)जिल्हा कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने अल्पसंख्यांक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.यावेळी जावेद हबीब यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाने जनतेच्या समस्या सोडवावे तसेच पक्षाचे कामासाठी आपण सदैव तत्पर रहावे आणि पक्षासाठी जनजागरण करावे.अल्पसंख्याक समाजाच्या हितासाठी आपण काम करावे असे यावेळी सांगितले. सैय्यद लायकोद्दीन यांनी सांगितले आहे की,राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने माझी जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.मी दौलताबाद येथे समाजसेवेच्या माध्यमातून अनेक कामे केलेले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माझ्यावर जी जबाबदारी देण्यात आलेली आहे,ती मी इमाने इतबारे पार पाडणार असून पक्षासाठी सतत काम करत राहणार असे यावेळी सैय्यद लायकोद्दीन यांनी सांगितले.यावेळी प्रदेश अध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र जावेद हबीब,राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष इलियास किरमाणी, शहराध्यक्ष खाजा शरफोद्दीन मुल्ला,अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष रज्जाक पठाण,शहराध्यक्ष शेख ताहेर, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष शेख शफिक, प्रदेश उपाध्यक्ष सलीम पटेल वाहेगावकर,प्रदेश उपाध्यक्ष अशरफ पठाण,प्रा.वाकेकर सर,माजी नगरसेवक जमील खान,अल्पसंख्यांक पुर्व विधानसभा अध्यक्ष शेख समीर, सैय्यद परवेज,दिलीप साठे,शेख शकील,रवि दिवेकर, कल्याण कांजुणे पाटील,फारुक कुरैशी आदिंची उपस्थिती होती.
What's Your Reaction?






