मौलाना सज्जाद नौमानींच्या उपस्थितीत आज बैठक |
मौलाना सज्जाद नौमानींच्या उपस्थितीत आज बैठक
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क औरंगाबाद| राज्यात मराठा, मुस्लिम, दलित मतांचे समीकरण जुळविण्यासाठी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि विश्वविख्यात मुस्लिम धर्मगुरु मौलाना सज्जाद नौमानी यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यादृष्टीने गुरुवारी (दि.३१) अंतरवाली सराटी येथे विविध समाजाच्या धर्मगुरूंसह काही पदाधिकाऱ्यांना बैठकीस निमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी स्वतः सज्जाद नौमानी उपस्थित राहणार आहेत.
मनोज जरांगे-पाटील आणि मौलाना सज्जाद नौमानी यांची ९ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद शहरात शहरातील एका
हॉटेलमध्ये मध्यरात्री बैठक झाली होती. या बैठकीत उभयतांमध्ये विधानसभा निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. लवकरच पुढील बैठक निश्चित होईल, असेही यावेळी सांगण्यात आले होते. राज्यातील उपेक्षित गोरगरिब, सर्वसामान्य, अल्पसंख्याक आदी घटकांना न्याय मिळावा यासाठी मुस्लिम आणि मराठा समाजाने एकत्र यावे यादृष्टीने चर्चा झाली होती.
या चर्चेनंतर आता ३१ ऑक्टोबरला अंतरवाली सराटीमध्ये दुसरी बैठक होत आहे. या बैठकीस मराठा, मुस्लिम, दलित समाजाचे धर्मगुरू व मुख्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
What's Your Reaction?






