वैजापूरच्या राजकारणात मोठा भूकंप ! तालुका अध्यक्ष अकील कुरैशी, शहर अध्यक्ष वसीम खान यांच्याकडून पदाचा राजीनामा, AIMIM च्या शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

 0
वैजापूरच्या राजकारणात मोठा भूकंप !  तालुका अध्यक्ष अकील कुरैशी, शहर अध्यक्ष वसीम खान यांच्याकडून पदाचा राजीनामा, AIMIM च्या शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

वैजापूरच्या राजकारणात मोठा भूकंप !

 

तालुका अध्यक्ष अकील कुरैशी, शहर अध्यक्ष वसीम खान यांच्याकडून पदाचा राजीनामा, AIMIM च्या शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

वैजापूर प्रतिनिधी  दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क 

वैजापूर तालुक्याच्या राजकारणात (दि.२६) रोजी मोठा राजकीय भूकंप झाला आहे. AIMIM पक्षाचे तालुका अध्यक्ष अकील कुरैशी शहर अध्यक्ष वसीम खान यांच्या राजीनाम्याने मोठा हादरा बसला. सन २०१९ लोकसभा निवडणुकीत AIMIM पक्षाचे उमेदवार सय्यद इम्तियाज जलील यांना वैजापूर- गंगापूर तालुक्यातून ३६,००० हजार असे भरघोस मताधिक्य देऊन विजय मिळवला होता तर सन २०२४ या लोकसभा निवडणुकीत २५,००० हजार असे मतदान दिले होते. सन २०१९ लोकसभा निवडणुकीत AIMIM पक्षाचे उमेदवार सय्यद इम्तियाज जलील यांना वैजापूर- गंगापूर तालुक्यातून ३६,००० भरघोस मताधिक्य देऊन सुद्धा निवडून आलेले खासदार इम्तियाज जलील यांनी तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणत्याही प्रकारचा रस दाखविला नाही तसेच AIMIM पक्षाचे तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी वेळोवेळी त्यांना तालुक्यात असलेल्या समस्याची जाणीव करून देण्यासाठी निवेदन दिली आणि त्याचा पाठपुरावा केला परंतु खासदार इम्तियाज जलील यांनी वैजापूर तालुक्यातील समस्याकडे दुर्लक्ष करीत त्याच्या निवेदनालाच नव्हे तर वैजापूर तालुक्याला केराची टोपली दाखवली. यावरच मा. खासदार न थांबता वैजापूर विधानसभेत च्या उमेदवारीसाठी दावा सांगत उमेदवारी अर्ज खरेदी केला. याबाबत पक्षाच्या कोणत्याही पदाधिकारी व कार्यकर्त्याला विश्वासात घेतले नसल्याने वैजापूर तालुक्याचे तालुकाध्यक्ष अकील कुरेशी, शहराध्यक्ष वसीम खान, अबू पठान गोलवाड़ी, इसराइल पठान शिवराई, नासिर खान खंडाला, कामरान खंडाला, फारूक मौलाना वर्जी,इरफान शेख वर्जि, एडवोकेट राइस, रजक शेख जातेगांव,शमीम भाई लासुर, जावेद भाई लासुर, समीर शेख बाबुलगांव,जमीर शेख बाबुलगांव, अनु शेख लोणी, आरिफ शेख तलवाड़ा, ताहिर शेख जानेफऴ, शेख बाबू जरूळ, शकील शेख लोणो, साकिब सैयद धोधळगाव,शकील भाई गोलवाड़ी,साकिर भाई तीडी, अकबर मौलाना दहेगांव, साहिल शेख वांजरगांव, एजाज शेख लड़गांव, बबलू सोनवणे डोनगांव, संदीप कस्बे डोनगांव, रसूल भाई नेवारगांव, अकील इनामदार भऊर, हुसैन भाई नादी,जुबेर शेख मस्की, लाला पठान माळीसागज़, अल्ताफ सौदागर, नासिर कुरेशी, फारेज़ कुरैशी, वाजिद कुरैशी, जाकिर शेख,हाफिज शाहरुख, ज़ाहिद खान यासोबत पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow