प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारार्थ ऋषिकेश जैस्वाल, विश्वनाथ राजपूत यांची भव्य पदयात्रा "युवकांच्या समस्यांवर देणार लक्ष"

 0

प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारार्थ ऋषिकेश जैस्वाल, विश्वनाथ राजपूत यांची भव्य पदयात्रा 

"युवकांच्या समस्यांवर देणार लक्ष"

मध्य मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारार्थ आज ऋषिकेश जैस्वाल आणि विश्वनाथ राजपूत यांनी भारतमातानगर मध्ये भव्य पदयात्रा काढली होती. प्रदीप जैस्वाल यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

यावेळी बोलताना ऋषिकेश जैस्वाल म्हणाले, "महायुती सरकार हे सर्वच स्तरावरील नागरिकांचा विकास करत आहे. युवकांच्या देखील समस्या या सरकारच्या काळात सोडविल्या गेल्या. आगामी काळात देखील हे काम सुरु राहणार, युवकांच्या रोजगारासारख्या गंभीर प्रश्नावर हे सरकार योग्य उपाययोजना करेल असे ते म्हणाले." या पदयात्रेदरम्यान नागरिकांनी ऋषिकेश जैस्वाल आणि विश्वनाथ राजपूत यांचे औक्षण केले. तसेच ढोल-ताशा वाजवत, फटाके फोडत नागरिकांनी यांचे स्वागत केले. यावेळी नागरिकांनी देखील प्रदीप जैस्वाल यांना मतदान करू असे म्हणत विश्वास दाखवला. या पदयात्रेला, राजू अहिरे, के.एम.पाटील, रमेश सूर्यवंशी, सागर पाले, मुकेश जैन, ह.भ.प.शिरसाठ मामा, वशिष्ट शिरसाठ, विजय अहिरे, तेजस पाटील, शारदा घुले, संगीता बोरसे, डबीर काकू यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कर्यकर्ते उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow