एकनाथ शिंदे म्हणाले, भाजप-महायुती मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय घेईल, त्याला आमचा पाठिंबा असेल

एकनाथ शिंदे म्हणाले, भाजप-महायुती मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय घेईल, त्याला आमचा पाठिंबा असेल
मुंबई दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत #महायुतीला मोठं #यश मिळालंय. महायुतीला महाराष्ट्रात 236 जागा मिळाल्या आहेत. 132 जागा मिळवून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातील सर्वांत मोठा पक्ष ठरलाय. दुसरीकडे #अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 तर शिंदेंच्या शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. मुख्यमंत्री #एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत याबाबत सविस्तर भाष्य केलंय. मी अगदी मनमोकळेपणाने काम करणारा माणूस आहे. सर्व पदांपेक्षा लाडका भाऊ हे मोठं #पद आहे. मी #प्रधानमंत्री साहेबांना फोन केला. त्यांना म्हणालो, सरकारमध्ये निर्णय घेताना आमची कोणतीही अडचण येणार नाही. तुम्ही आम्हाला अडीच #वर्ष संधी दिली. तुम्ही घेतलेला निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल. निर्णय घेताना वाटू देऊ नका की, एकनाथ शिंदेची अडचण आहे, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
What's Your Reaction?






