आगामी गणेश उत्सवाचे अनुषंगाने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी ग्रामीण पोलीसांची घेतली आढावा बैठक

 0
आगामी गणेश उत्सवाचे अनुषंगाने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी ग्रामीण पोलीसांची घेतली आढावा बैठक
आगामी गणेश उत्सवाचे अनुषंगाने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी ग्रामीण पोलीसांची घेतली आढावा बैठक

आगामी गणेश उत्सवाचे अनुषंगाने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी ग्रामीण पोलीसांची घेतली आढावा बैठक …

औरंगाबाद: प्रतिनिधी 

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क 

 आगामी सार्वजिनक गणेशोत्सव-2024 व ईद-ए-मिलाद च्या अनुषंगाने मा. विरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र, छ. संभाजीनगर यांनी मा. डॉ. विनयकुमार राठोड, पोलीस अधीक्षक, मा.सुनिल कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक यांची उपस्थितीत जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व प्रभारी व शाखा अधिकारी यांची आढावा बैठक आज दिनांक 04/09/2024 रोजी 16:00 वाजता घेण्यात आली.  

 आगामी सण हे उत्साहात नागरिकांना साजरे करण्यात यावे याकरिता मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी सर्व अधिकारी यांना सुचना दिल्या कि, प्रामुख्याने श्री मुर्ती ची प्रतिष्ठापणा करण्यापुर्वी गणेश मंडळांनी ऑनलाईन पध्दतीने स्थानिक पोलीस ठाण्याची परवानगी घेणे अत्यावश्यक आहे. तसेच वॉटर प्रुफ मंडपाची व्यवस्था करून मंडप हा वाहतुकीस अडथळा करेल किंवा वाहतुकीची कोंडी निर्माण होईल अशा पध्दतीने रस्त्यावर टाकु नये. श्री मुर्ती ज्याठिकाणी स्थापन होणार आहे ती जागा ही संपुर्ण पणे लाकडी बॅरेकेटींग करून घेणे अत्यावश्यक आहे, जेणे करून श्रीमुर्ती जवळील खाद्यपदार्थ खाण्यासाठी कोणातेही मोकाट जनावरे प्रवेश करून शकणार नाही. ज्यामुळे श्री मुर्तीचे पावित्र्यास धोका निर्माण होणार नाही. ध्वनी प्रदुषणांचे नियंमाचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक आहे. याचे उल्लंघन झाल्यास गणेश मंडळांना कायदेाशिर कारवाईस सामोरे जावे लागेल. गणेश मंडळ परिसरात सी.सी.टी.व्ही. कॅमेरा लावावा. पारंपारिक वाद्यांचा वापर करणे गरजेचे आहे. तसेच गणेशमंडळात किंवा परिसरात बसुन जुगार खेळणा-याची सुध्दा गय करु नये अशा विरोध्दात जुगार कायद्यान्चये गुन्हे दाखल करण्यात यावे.

तसेच सर्व प्रभारी अधिकारी यांनी विसर्जन मिरवणुक मार्ग हा स्वत: पायी फिरुन बघावा त्यामध्ये अडथळा असल्यास संबधीत विभागाला पत्र व्यवहार करावा. तसेच विसर्जन मिरवणुकी मध्ये डी. जे. व दारु कोठुन येते त्याचा तपास करण्यात यावा. मिरवणूक मार्गा मध्ये ड्रोन द्वारे पाहणी करून विसर्जनाचे दिवशी ड्रोन कॅमेरा वापरण्यात यावा. गणेश मुर्तीच्या संरक्षणासाठी गणेश मंडळातील पदाधिकारी यांचे द्वारे 24 तास स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात यावी. ज्याठिकाणी दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होवुन गुन्हे दाखल आहेत. त्याठिकाणी सायबर पोलीस ठाणे मार्फत तरुणामध्ये जनजागृतीपर व्हिडीओ संदेश प्रसारित करण्यात यावे. अचानक उद्भवणा-या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी दंगा काबु योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी.

विसर्जन ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातुन पोहणारे व्यक्ती, लाईफ जॅकेट व इतर साहित्यासह ठेवण्यात यावे. याचप्रमाणे विसर्जनस्थळी गोंधळ होणार नाही याची दक्षता घेवुन तेथे पुरेसा प्रकाशाची व्यवस्था एम.एस.ई.बी. च्या मार्फर्तीने ठेवण्यात यावी याबाबत प्रभारी अधिकारी यांनी संबधी विभागाशी विसर्जन पावेतो संपर्कात रहावे.

यापुर्वी घडलेल्या दोन धर्मातील तणावाचे संदर्भातील गुन्हयातील आरोपीवर प्रभावी प्रतिबंधात्क कारवाई करावी. मुली व महिलांना गणेशउत्सावाचे दरम्यान छेडछाड होणार नाही. यासाठी पोलीस ठाणे येथे स्थापन असलेले पोलीस काका व दिदी पथक यांनी प्रभावीपणे पायी पेट्रोलिंग नेमावी. गणेश उत्सव मध्ये स्थापने पासुन विसर्जनापर्यंत प्रत्येक ठिकाणी दृश्य स्वरूपात पोलीस दिसला पाहिजे याची जबाबदारी प्रभारी अधिकारी यांची आहे.

या गणेशउत्सावात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये तसेच राष्ट्रीय एकात्मता व धार्मिक – जातीय सलोखा अबाधित ठेवावा. जनसंपर्क वाढवावा व जास्तीत जास्त नागरिकांनी पोलीसांच्या कामात मदत करावी यासाठी पोलीसांनी शांतता समिती, मोहल्ला

 समिती, कॉर्नर बैठका व गाव भेटी द्याव्यात अशा सुचना व मार्गदर्शन करून बैठकीचे समारोप करण्यात आला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow