मुस्लीम धर्मियांचे धर्मगुरू व समाजाविरोधात अपशब्द वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ पिंपळवाडी परसातील मुस्लीम समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढला आला
मुस्लीम धर्मियांचे धर्मगुरू व समाजाविरोधात अपशब्द वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ पिंपळवाडी परिसरातील मुस्लीम समाजाच्या वतीने दि.६ शुक्रवार रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला व नायब तहसीलदार विष्णूपंत घुगे ,सपोनि ईश्वर जगदाळे यांना निवेदन देत रामगिरी महाराज यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
पैठण: पिंपळवाडी: पि
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
पोलिसांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मुस्लीम धर्मियांचे धर्मगुरू व समाजाविरोधात रामगिरी महाराज यांनी अपशब्द वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत यामुळे समाजाविरोधात विधान केल्याबद्दल कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. व तसेच आमदार नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ घोषणाबाजी करत त्यांच्या वर कारवाई करण्याची मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी केली.
What's Your Reaction?






