मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकावर हसूलमध्ये तुफान दगडफेक!, पथक अक्षरशः जीव मुठीत घेऊन पळाले... [छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) :

मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकावर हसूलमध्ये तुफान दगडफेक!, पथक अक्षरशः जीव मुठीत घेऊन पळाले...
[छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) :
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
पंतप्रधान आवास योजनेतून हसूल परिसरातील गट क्र. २१६ आणि २१७ मध्ये गृह प्रकल्प साकारण्यात येणार आहे. या ३९ एकर जागेवरील १८० अतिक्रमणे मोठ्या विरोधाला न जुमानता महापालिकेने सोमवारी (२४ मार्च) काढली. त्यानंतर मंगळवारीही पथक आले असता संतप्त अतिक्रमणधारकांनी तुफान दगडफेक केली. यात अतिक्रमण निर्मूलन पथकाचे दोन कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी हसूल पोलीस ठाण्यात दगडफेक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मोठ्या विरोधाला न जुमानता महापालिकेने सोमवारी (२४ मार्च) काढली. त्यानंतर मंगळवारीही पथक आले असता संतप्त अतिक्रमणधारकांनी तुफान दगडफेक केली. यात अतिक्रमण निर्मूलन पथकाचे दोन कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी हसूल पोलीस ठाण्यात दगडफेक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[पंतप्रधान आवास योजनेच्या गृह प्रकल्पासाठी कंत्राटदाराला वर्कऑर्डरही देण्यात आली आहे. त्यासाठी जागा मोकळी करून द्यावी लागणार आहे. प्रकल्पासाठी अडीच एकर जागा लागणार आहे. या जागेवर अतिक्रमण करून १८० नागरिकांनी घरे थाटली होती. हे अतिक्रमण पोलीस बंदोबस्त नसतानाही महापालिकेने स्वतःच्या बळावर सोमवारी काढले. त्यानंतर मंगळवारी सकाळी ११:३० वाजता इमारत निरीक्षक अश्विनी कोथलकर यांच्या नेतृत्वाखाली पथक पुन्हा हसूलमध्ये धडकले.
ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना साहित्य काढून घेण्याची विनंती केली. आधीच घरे उद्ध्वस्त झालेली असल्याने नागरिक संतप्त होते. त्यांनी आरडाओरड करत पथकावर दगडांवर दगडांचा वर्षाव केला. यात पथकातील माजी सैनिक गजानन चितळे यांचे डोके फुटले तर रामेश्वर निकम यांच्या पायाला मार लागला. जमावाचा रौद्रावतार पाहून पथक अक्षरशः पळाले. सोमवारीही काही महिलांनी दगड उचलले होते. मात्र, ते पथकावर भिरकावले नव्हते. मंगळवारी मात्र त्यांचा संयम सुटला.
What's Your Reaction?






