डॉ सुरेश सोनवणे यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

 0
डॉ सुरेश सोनवणे यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
डॉ सुरेश सोनवणे यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

डॉ सुरेश सोनवणे यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद 

गंगापूर खुलताबाद प्रतिनिधी 

गंगापूर खुलताबाद विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास सुरुवात झाली असून अपक्ष उमेदवार डॉ सुरेश सोनवणे यांना मतदारसंघात तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत मोठी पसंती मिळत आहे. 

गंगापूर तालुक्यातील गावांमध्ये जनसंवाद दौऱ्यादरम्यान अपक्ष उमेदवार डॉ सुरेश सोनवणे यांनी भाजपचे प्रशांत बंब व सतीश चव्हाण या प्रस्थापितांच्या विरोधात दंड थोपटले असून प्रस्थापित पंधरा वर्ष व सतरा वर्षे राहिलेल्या आमदारांना यामुळे घाम फुटला आहे. उच्चशिक्षित तरुण दूरदृष्टी नेतृत्व असलेल्या अपक्ष उमेदवार डॉ सोनवणे यांना दौऱ्या दरम्यान मतदारांनी पसंती दर्शवली असून जामगाव, गळलिंब, कायगाव, शिंदेवाडी, कणकोरी,दिघी, तुर्काबाद गावोगावी झालेल्या जनसंवाद दौऱ्यादरम्यान तरुण महिला व वयोवृद्धांनी आपल्या भागातील समस्यांचा पाढा डॉ सोनवणे यांच्या समोर वाचला व आश्वासन नको तर बदल हवा या अपेक्षेने डॉ सोनवणे यांना पसंती दर्शवली दरम्यान मी आपला भूमिपुत्र असून आपल्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी कायम आपला बांधिल राहील तसेच मतदार संघातील प्रत्येक घटकाचा विकास यासह शाश्वत विकासावर मी काम करणार असून प्रस्थापितांविरुद्ध भूमिपुत्राची लढाई सुरू आहे या लढाईमध्ये आपण मतदान रुपी आशीर्वाद देऊन मला आपली सेवा करण्याची संधी द्याल असे उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना डॉ सोनवणे यांनी सांगितले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow