'आझाद अली शाह कॅम्पसमध्ये वार्षिक क्रिडा स्पर्धा उत्साहात संपन्न"

 0

1.

" आझाद अली शाह कॅम्पसमध्ये 

   वार्षिक क्रिडा स्पर्धां उत्साहात संपन्न" 

प्रति,

 मा.संपादक साहेब

 दैनिक .................औरंगाबाद

( औरंगाबाद - प्रतिनिधी ) आझाद अली शाह शिक्षण संस्था खडकेश्वर द्वारे संचलित शायनिंग स्टार मराठी व इंग्रजी प्राथमिक शाळा आणि एम.जी.एम वस्तानवी उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत मोठ्या उत्साहात आनंदमय वातावरणात " वार्षिक क्रीडा स्पर्धांचे " आयोजन करण्यात आले, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष एम.जी.एम कॉलेज बीएमसीजे चे डॉ. प्रो. शेख शाहेद होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक ऑटोमॅटिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे असिस्टंट जनरल मॅनेजर विनय पनियार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सानिया मोटर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर मेहेर सचिन मुळे, औरंगाबाद एम आय एमचे जेष्ठ नेते नासिर सिद्दिकी, नगरसेवक 

 तथा रहेबर उर्दू डेली वर्तमानपत्राचे संपादक जमीर अहमद खादरी, चेतन राजपूत हे होते, यासोबत यावेळी शायनिंग स्टार शाळेचे.चे मु.अ. साजिद पाशा, एम.जी.एम. वस्तानवी शाळेच्या मु.अ. अमरीन खान व शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व अनेक पालक उपस्थित होते.

          आलेल्या सर्व पाहुण्यांचा परिचय करून पाहुण्यांना शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आले तद्नंतर कार्यक्रमाचे उद्घाटक यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून वेगवेगळ्या क्रिडा स्पर्धांचे उद्घाटन रितसरपने करण्यात आले. 100 मिटर धावने, रिले रनिंग, निंबु चमचा शर्यत, बोर्ड बॅलंसिंग, गोनपाट शर्यत, पुश अप्स आशा वेगवेगळ्या मैदानी खेळ गटात गटात घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपली पुर्ण कस लावत विजय होण्यासाठी आतोनात प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

             त्यानंतर शाळेचे मु.अ. साजिद पाशा यांनी आपल्या मनोगतामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचे कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त करुन शाळेकडून होत‌ असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली. विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पराजीत झालेल्या विद्यार्थ्यांना खेचुन न जाता पुन्हा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. त्यानंर अध्यक्षीय भाषणात विनय पनियार यांनी विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व‌ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले व आज या चिमुकल्यांना खेळतांना बघुन आपले बालपण आठवल्याचे सांगितले. 

       ‌ यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख आरीफ यांनी केले तर यांनी आभार प्रदर्शन वैष्णवी देहाडे यांनी केले. मदिहा फातेमा, शुभांगी कुलकर्णी, बुरहाना पठाण, फौजिया शेख, सुमैया शेख, धनश्री खिल्लारे, भक्ती बाळुबेटाळसे, शेख निदा, सैय्यद सोनम, शेख निलोफर ,सैयद सादिया, शेख जिनत, आशा ढोकणे, सलमा खाला , नफीसा खाला, शेख आरीफ आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी प्रयत्न केले. राष्ट्रगिता नंतर विद्यार्थ्यांना व पालकांना स्वादिष्ट जेवण देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

                            आपला

साजिद पाशा 

 (मुख्य प्रशासकीय अधिकारी ) आझाद अलि शाह शिक्षण संस्था 

 खडकेश्वर , औरंगाबाद.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow