Adul Accident : भरधाव हायवा ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

 0
Adul Accident : भरधाव हायवा  ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
Adul Accident : भरधाव हायवा  ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

Adul Accident : भरधाव हायवा

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

आडुळहुन छत्रपती संभाजीनगर येथे कामाला जात असतांना तरुणाच्या दुचाकीला पाठीमागुन भरधाव वेगाने येणाऱ्या

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क 

आडुळ - दुचाकीवर फर्निचरचे काम करण्यासाठी आडुळहुन छत्रपती संभाजीनगर येथे कामाला जात असतांना लाकडी कारागीर तरुणाच्या दुचाकीला पाठीमागुन भरधाव वेगाने येणाऱ्या हायवा ट्रक (सिमेंट मिक्सर मशीन) ने जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. ७) रोजी घडली. मयत तरुणाचे प्रवीण रामेश्वर चवेल असे नाव आहे.

दररोज छत्रपती संभाजीनगर शहरात लाकडी कारगीर असलेला प्रविण रामेश्वर चवेल (वय-३० वर्षे) राहणार आडुळ खुर्द, ता. पैठण हा त्याच्या दुचाकी क्रमांक आरजे ३७ एसपी ४७०३ ने कामाला जात होता.

सोमवारी सकाळी तो त्याच्या दुचाकीवर कामाला जात असतांना छत्रपती संभाजीनगर येथील बीडबायपास वरील एमआयटी कॉलेज समोरील रसच्यावर त्याच्या पाठीमागून येणाऱ्या हायवा ट्रक क्रमांक एमएच २० सीटी ७७७३ ने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली यात त्याचा मृत्यू झाला.

अपघात होताच ट्रक चालक ट्रक तिथेच सोडून घटनास्थळावरून पसार झाला होता. शवविच्छेदनानंतर प्रविण चवेल याचा मृतदेह राजस्थान येथील त्याच्या मुळ गावी नेण्यात आला. या अपघाताची नोंद सातारा पोलिस ठाणे छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात आली असून, पुढील तपास बिट जमादार पृथ्वीराज चव्हाण हे करीत आहे. प्रविण हा आई वडीलांना एकुलता एक मुलगा होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow