वैजापूरात 'ईद ए मिलाद' उत्साहात साजरी

 0
वैजापूरात 'ईद ए मिलाद' उत्साहात साजरी
वैजापूरात 'ईद ए मिलाद' उत्साहात साजरी

वैजापूरात 'ईद ए मिलाद’ उत्साहात साजरी

वैजापूर प्रतिनिधी:  दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क 

इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव (ईद-ए-मिलाद) वैजापूर शहरात उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सय्यद जुबेरुद्दिन कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि.१६) रोजी शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या रजा मस्जिद येथुन पैगंबर साहेबांच्या जन्मोत्सव मिरवणूक ‘जुलूस’ काढण्यात आला. यात सर्व स्थरातील नागरिकांनी सहभाग घेतला.

इस्लामी कालगणनेतील ‘रबीऊल अव्वल’ महिन्याच्या १२ तारखेला प्रेषित मुहम्मद पैगंबर यांची जयंती दरवर्षी साजरी केली जाते. मागील वर्षांपासून गणेश उत्सव व ईद ए मिलाद असे दोन्हीं सण एकत्र येत आहे. त्यात मुस्लीम बांधवांनी एवढा जनसमुदाय लोटला होता तरी वैजापूर करांनी शांततेचा आदर्श घडवून आणला. 

मुस्लीम समाजबांधवां मध्ये अधिक उत्साह पहावयास मिळाला. मुस्लीम बहुल मोहल्ले, घरे, दुकाने आकर्षक सजावट व रोषणाईने उजळून निघाली. सर्वत्र उत्साह अन चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. शहरातील मुस्तफा पार्क येथे पवित्र धार्मिक स्थळ ‘मक्का शरीफ’ च्या प्रतिकृती उभारून धार्मिक देखावे सादर करण्यात आले तसेच या मिरवणुकी मध्ये वाहनावर पवित्र धार्मिक स्थळ "मक्का शरीफ" च्या प्रतिकृती उभारून धार्मिक देखावे सादर करण्यात आले. 

शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ग्रामीण पोलीसांच्या परवानगीने शहरात मर्यादित स्वरूपात केवळ परंपरा राखण्याच्या उद्देशाने "जुलूस-ए-मुहम्मदी" ची मिरवणूक काढण्यात आली. शहरातील रजा मस्जिद येथून सकाळी आठ वाजता जुलूसला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी वाहनांना इस्लामी ध्वज तसेच फुलांचे हार, फुगे लावून सजविण्यात आले होते. अग्रभागी अश्ववर सय्यद जुबेरुद्दिन कादरी हे विराजमान होते. पारंपरिक पद्धतीने फातिहा पठण करत जुलूसला सुरुवात झाली. जुलूस मार्गावर ठिकठिकाणी ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. विनय कुमार राठोड व अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप भागवत, पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार सकाळ पासून शहरात तळ ठोकून होते.

 वैजापूर पोलीस ठाणे व सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या वतीने धर्मगुरुंचे व तमाम समाज बांधवांचे प्रातिनिधीक स्वागत करण्यात आले तसेच ‘जुलूस-ए-मुहम्मदी’ च्या वतीने सर्व उपस्थीत प्रतिष्ठितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी मा.नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय दंडाधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड, उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप भागवत, पोलीस निरीक्षक शाम सुंदर कौठाळे, मा.उप नगराध्यक्ष साबेर खान, मा.उप नगराध्यक्ष अकिल शेख, मा. उप नगराध्यक्ष मजीद कुरैशी, सामाजिक कार्यकर्ते धोंडिरामसिंग राजपुत, ॲड. राफे हसन, काजी हाफिजोद्दिन, उध्दव सेनेचे तालुका प्रमुख सचिन वाणी, मा. नगरसेवक शैलेश चव्हाण, हमीद कुरैशी, बिलाल सौदागर, मुफती तय्यब रशीदी, 

मौलाना आलम रशीदी, मौलाना मुबारक हुसैन,मौलाना अमीन,हाफिज जुनैद ,

मौलाना सैयद दानिश, हाफिज फैसल, 

हाफिज सैयद मोईन,हाफिज अबदुल अज़ीज, हाफिज मोईन, हाफिज सोहल कुरेशी,मिनहाज़ कादरी, अकबर कादरी,इरफान अत्तार, हाफिज मुजाहिद,

हाफिज अरबाज़,हाफिज तौफीक,

हाफिज अरबाज़,हाफिज नाजीम, हाफीज शहर यार, मा.नगरसेवक रियाज शेख, ॲड.जावेद बेग, अकील कुरैशी, अल्ताफ बाबा, ॲड. मजहर बेग, वसीम शेख, आमीर अली, सय्यद ग्यास (मामु), एराज शेख, रजा(भैय्या) खान, आमेर पठाण, जाकेर कुरैशी, समीर सय्यद, अमजद अली सय्यद, फेरोज भाईजान, मोहसीन शेख, वाहेद पठाण, शफीक शेख, फराज पटेल, गुलाम काकर, राजू कुरैशी, फेरोज पठाण, जाफर शेख, रईस शेख, तालेब सय्यद, आवेस पठाण, नासिर सौदागर, शारेख मन्सुरी, वसीम पठाण, कशिफ शेख, फरदिन, अर्शद, हबीब, रईस, आसेफ, आफताब, तौफिक, हाफीज सौदागर, दरवेश काकर, यांच्या समवेत तमाम समाजबांधव उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow