फुलंब्री मतदार संघातील विकासाचा अनुशेष भरून काढणार : अनुराधा चव्हाण विविध संघटनांच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा देत बहुमताने निवडून आणण्याचा केला निर्धार

फुलंब्री मतदार संघातील विकासाचा अनुशेष भरून काढणार : अनुराधा चव्हाण
विविध संघटनांच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा देत बहुमताने निवडून आणण्याचा केला निर्धार
फुलंब्री:
समाजकारणात आणि राजकारणात आतापर्यंत तुम्हाला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला असून यापुढेही विकासाचा उर्वरित अनुशेष भरून काढण्यासाठी मी कटिबद्ध आहे. त्यासाठी मला आपली मतदानरुपी साथ हवी आहे, असे आवाहन महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी मतदारांना केले.
अनुराधा चव्हाण यांनी फुलंब्री विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा झंजावात सुरू केला आहे. बुधवार (दि.१३) रोजी मतदारसंघात चौका, सारोळा, कानकोरा, लिंगदरी, धोनखेडा, खामखेडा, चौकावाडी, साताळा, मोरहीरा, डोनवाडा तांडा, डोनवाडा, बोरवाडी, बोरवाडी तांडा, आडगाव सरक, सेवानगर, अंजनडोह तांडा, अंजनडोह, लामकाना, नायगव्हाण, लामकानावाडी, हातमाळी, सेलूद, चारठा या गावांमधील भेट दौऱ्यात गावांमधील कॉर्नर बैठकानी सभेचे स्वरूपात घेतल्याचे पाहायला मिळाले.
या दौऱ्यात अनुराधा चव्हाण यांनी कॉर्नर बैठका घेत स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला. या भागात मागेल तिथे सभागृह, पर्यटन विभागाच्या निधीसह अन्य योजनेतून मंदिरे व अन्य धार्मिक स्थळांचा विकास केला आहे. त्याचबरोबर अनेक कामे प्रगतीपथावर तर अनेक कामे निधीसह मंजूर करण्यात आली असल्याचेही अनुराधा चव्हाण म्हणाल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ, तालुकाध्यक्ष राधाकिसन पठाडे, युवा जिल्हाध्यक्ष सजन बागल, रामराव शेळके, राम शेळके, अर्जुन शेळके, शिवाजी वाघ, डॉ.भगवान नांगरे, दगडू वाघ, योगेश अंभोरे, कृष्णा सोटम, शांतीलाल गुंजाळ, डॉ. मुलतानी, विजय काळे, अशोक नाबदे, दौलत शेजूळ, साहेबराव डिघुले, कैलास ढाकणे, अमोल वाघ, पुंडलिक नांगरे, संतोष म्हस्के, सरसा वाघ, ऐश्वर्या गाडेकर, सविता फुके, मनीषा मुंढे, मयूरी तनपुरे, ज्योती पवार, सुनीता आवरादे, शिवगंगा जायभाये, संगीता ताठे, रजना ताठे, संगीता वाघ, राणी सोनवणे,सोनाली गावंडे, रेखा आठुळे आदींची उपस्थित होती.
_____
बॉक्स
गणोरीत सेल्फीसाठी गर्दी :
गणोरी येथे संत रामलाल बाबा गेंदाई पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त आयोजित ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज राऊत यांच्या काल्याच्या किर्तनाला अनुराधा चव्हाण यांनी उपस्थित राहून हरिनामाचा आनंद घेतला. किर्तन संपल्यानंतर गावातून बाहेर जात असताना कीर्तनासाठी आलेल्या तरुण-तरुणी सह महिलांनी चव्हाण यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
_____
चव्हाण यांना बहुमताने विजयी करण्यासाठी या संघटनांनी दिला पाठिंबा :
विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या वतीने सुतार, लोहार, सोनार, तांबट, पाथरवट, जांगिड समाज बांधवांनी पीएम विश्वकर्मा योजनेसह अशा विविध योजना राबवून अनुराधा चव्हाण समाजाच्या विकासाला गती देतील असा विश्वास दर्शवत
समाजबांधवांनी पाठिंबा दिला. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष अरूण भालेकर, प्रदेशउपाध्यक्ष गोपाल राऊत, सरचिटणीस संजय सुतार आदींसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रसंत सेना महाराज युवा परिषदेने महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी केलेल्या विकास कामाचे कौतुक करत समाजातील विविध मागण्यांचे प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी चव्हाण या समर्थ असल्याचा विश्वास दर्शवत पाठींबा दिला. यावेळी राष्ट्रसंत सेना महाराज युवा परिषदे प्रा.राजकुमार गाजरे,मुजाभाऊ भाले, रामेश्वर सवणे, सुरेश बोर्डे, राम निंबाळकर, शरद पंडित, नवनाथ घोडके आदींसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. चव्हाण यांना बहुमताने विजयी करण्याचा संकल्प यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला.
_____
तुम्ही ताईंना निवडून द्या; आम्ही सर्व भाऊ मतदारसंघाचं सोन करू : सुहास शिरसाठ
विधानसभा मतदारसंघाचा मोठ्या प्रमाणावर असलेल्या जनतेच्या समस्या आम्ही मागील दहा वर्षात सोडवल्या आहेत. ज्या भागातील काही प्रश्न प्रलंबित आहेत ते देखील आपल्याला सोडवायचे आहेत. त्यासाठी तुम्ही भाजप, शिवसेना महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांना बहुमताने निवडून द्या, आम्ही सर्व भाऊ या मतदारसंघाचं सोने करून दाखवू. या भागात मोठ्या प्रमाणावर उद्योग आणून तरुणांच्या हाताला काम मिळवून देऊ. त्याचबरोबर जनतेचा मूलभूत विकास करून दरडोई उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न आहे. एकही शेतकऱ्यांची समस्या उरणार नाही, असा याठिकाणचा आमदार काम करेल असा शब्द जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी गाव भेट दौऱ्यातील सभेस उपस्थित जनतेला दिला.
What's Your Reaction?






